किल्ला चित्रपटातील बालकलाकार आता दिसतो खूपच हँडसम … अभिनयाला रामराम ठोकून लंडन मध्ये करतो हे काम
लहान मुलांच्या जीवनावर आधारित किल्ला हा चित्रपट खूपच खूपच गाजला होता. २०१४साली प्रदर्शित झालेल्या किल्ला ह्या चित्रपटाला आज जवळपास १० वर्ष होऊन गेली तरीही आजही हा चित्रपट तितकाच नवीन वाटतो. अभिनेत्री अमृता सुभाष आणि बाल कलाकार अर्चित देवधर, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट असलेल्या ह्या चित्रपटाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं होत. वडील नसलेला मुलाचा आई आपली नोकरी करत मुलाला कसं सांभाळून घेते हे ह्या चित्रपटात दर्शवलं आहे. आईच्या फिरत्या नोकरीमुळे शहरातून गावात आलेल्या तिच्या मुलाच्या मनावर कसा परिणाम होतो हे ह्या छोत्रपटात सुंदररित्या दर्शवलं आहे.
आपली शाळा, आपले नुकतेच बनलेले पण जिवा भावाच्या मित्रांपासून त्याला आईच्या नोकरीमुळे दूर सोडून जावं लागत. हा मुलगा म्हणजे चित्रपटातील हिरो चिनू म्हणजेच अभिनेता अर्चित देवधर. अर्चित देवधर हा किल्ला चित्रपटानंतर ‘६ गन ‘ आणि ‘सिद्धांत’ अश्या मोजक्याच चित्रपटांत पाहायला मिळाला. या चित्रपटानंतर त्याने अभिनयाला रामराम ठोकला आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात मग्न झाला. अर्चित अजूनही सिंगलच आहे. पुण्यात जन्मलेला अर्चित शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहॅम मध्ये शिकला. त्याला आवडीचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन तो तेथे काम देखील करू लागला. त्याच्या सोशल मीडियावर अकाउटवर तुम्हाला त्याने बनवलेल्या अनेक पदार्थांच्या डिश पाहायला मिळतील.
अर्चित देवधर सध्या बर्मिंगहॅम मध्ये राहत असून आता सध्या तिकडेच स्थायिक झाला आहे. Hilton Birmingham Metropole या आलिशान हॉटेलमध्ये तो काम करतो. किल्ला सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटामुळे अर्चित प्रकाश झोतात असताना त्याने आपल्याला आवडतं त्याच क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्धी पैसा यांच्या पेक्षा देखील वेगळं जग आहे हे हि तितिकच खर याच अर्चित देवधर हे उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.