धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांनी पती धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी माझा छळ केला, मला जेलमध्ये पाठवलं …माझी छोटी छोटी मुलं मला जेलमध्ये जाताना पाहून खूप रडत होती. त्या चिमुकल्यांची त्यांना दया पण नाही आली. एवढंच नाही माझ्या बहीणीलाही त्यांनी जाळ्यात ओढलं.
यानंतर करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेत खळबळजनक दावा केला की अशा अभिनेत्रींसाठी ते ओबेरॉय हॉटेल बुक करतात. जनतेचे पैसे यांच्यावर उडवतात असे म्हणत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या कारनाम्यांची एक लिस्टच समोर आली. करुणा मुंडे या व्हिडिओत म्हणतात की …, ” माझे पती धनंजय मुंडे हे अभिनेत्री प्राजक्ता माळी, ज्योतिका शिरोडकर, लता टेपी आणि मोनिका ह्यांच्यावर पैसे उधळतात…त्यांच्यासाठी ते ओबेरॉय हॉटेल बुक करतात”
दरम्यान करुणा मुंडे यांच्या या दाव्यानंतर अनेकजण प्राजक्ता माळीच्या बाजूने उभी आहेत.
तिच्याबद्दल अशी आक्षेपार्ह विधानं करून तिला बदनाम केलं जातंय. करुणा मुंडे यांनी हे विधान का केलं असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. प्राजक्ता माळीवर शिंतोडे उडवण्याच हे काम आहे. तिने आजवर तिच्या मेहनितेने मराठी सृष्टीत एक मोठं नाव लौकिक केलं आहे. त्यामुळे करुणा मुंडे यांचा हा दावा तिच्या चाहत्यांनी खोडुन काढला आहे.