news

कोणीही आमच्याबद्दल अफवा पसरवू नका…सुरज चव्हाणची चाहत्यांना मनापासून विनंती

सूरज चव्हाण बिग बॉसच्या ५ व्या सिजनचा विजेता झाल्यापासून चांगलाच चर्चेत येऊ लागला आहे. त्याच्या अवतीभोवती अनेक सोशल मीडिया स्टार्सची गर्दी जमायला लागली आहे. पण याचमुळे सुरजला आता नाहक त्रास सहन करावे लागत आहेत. सुरजने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार स्वतः सुरजला २ बीएचके घर बांधून देणार असे त्यांनी जाहीर केले होते. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या गटातील काही लोकांनी सुरजच्या घराची मोजणी केली आणि आता त्याच्या स्वप्नातल्या घराचा आराखडाही तयार केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सुरजच्या घराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नुकतेच सुरजने पुना गाडगीळ अँड सन्सकडून मिळालेल्या गिफ्टव्हाउचर मधून दागिन्यांची खरेदी केली आहे.

suraj chavan and kajal shinde
suraj chavan and kajal shinde

यावेळीही त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी विजेता झालेल्या सुरजच्या भेटीला सोशल मीडिया स्टार काजलने हजेरी लावली होती. हे दोघेही एकमेकांना वेबसिरीजपासून ओळखतात. त्या एका व्हिडिओत सूरज काजलला माझी हिरोईन असे बोलताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी अभिनेत्री काजल शिंदे हिला सुरजची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले. दोघेही लवकरच लग्न करणार अशीही बातमी व्हायरल झाली. यावरून सुरजने त्याच्या चाहत्यांना एक विनंती केलेली पाहायला मिळत आहे.

actress kajal shinde and suraj chavan
actress kajal shinde and suraj chavan

“आमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मित्रांनो काजल माझी खूप चांगली मैत्रीण आहे. पण आमच्यात प्रेम वगैरे तसलं काहीच नाहीये, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही वेबसिरीजमध्ये काम केलं होतं त्यामुळे मला वेबसिरीजमधली माझी हिरोईन असं मला तिला म्हणायचं होतं. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, अशा अफवा पसरवू नका एवढीच माझी चाहत्यांना विनंती आहे”. सूरजने हे स्पष्टीकरण देताना काजलला देखील सोबत घेतले होते. दोघांनी या व्हिडिओतून चाहत्यांना अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे. काही माध्यमांनी हे दोघे लग्न करणार असेही म्हटले होते. मात्र या दोघांमध्ये असे काहीच नाही ते केवळ मित्र आहेत. म्हणून एक मैत्रीण या नात्याने काजल सुरजची भेट घेण्यासाठी गेली होती. त्यामुळे आता दोघांच्याही स्पष्टीकरणानंतर या लग्नाच्या बातमीला पूर्णविराम मिळेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button