news

मालिकेत सायली अर्जुनचे हनिमून…पण माथेरानला पोहोचताच जुई गडकरी भयंकर संतापली

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत मधू भाऊंना निर्दोष ठरवण्यासाठी अर्जुन शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. त्यात त्याला लवकरच यश मिळेल अशी आशा सर्वांना आहे. पण यानंतर अर्जुन सायलीच्या प्रेमाला खरी सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीने कुठेतरी फिरायला जावे यासाठी कल्पनाने एक घाट घातला आहे. लवकरच हे दोघेही हनिमूनसाठी फिरायला जाताना दिसणार आहेत. मालिकेचे हे शूटिंग रायगड जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच माथेरानला पार पडत आहे. सायली आणि अर्जुन माथेरानला फिरायला गेलेले दाखवण्यात येणार आहे. शूटिंग निमित्त मालिकेची टीम या ठिकाणी पोहोचली असून जुई गडकरी या निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतेच जुईने माथेरान येथील निसर्गाचे सौंदर्य तिच्या मोबाईलमध्ये टिपले आहे.

पण एका बाजूला हा निसर्गाचा आस्वाद घेत असताना जुईला तिथे प्लास्टिकचा कचरा देखील दिसलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जुईने माथेरान येथील शारलोट तलावाचा निसर्गरम्य परिसर दाखवताना तिथे पसरलेल्या घाणीचे साम्राज्य देखील दाखवून दिले आहे. “देवाने सुंदर निसर्ग बनवला, प्राणी बनवले, पक्षी बनवले. खूप छान छान गोष्टिंची निर्मिती केली ….आणि त्यानंतर माणूस बनवला” असे म्हणत जुईने निसर्गाच्या सौंदर्यात आडकाठी आणणाऱ्या पर्यकटकांची कान उघडणी केली आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे पण जे लोक इथे फिरायला म्हणून येतात ते त्यांच्यासोबत घेऊन आलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाऊचे प्लास्टिकचे रॅपर तिथेच टाकून जातात. त्यामुळे ही मंडळी निसर्गाच्या सौंदर्यात आडकाठी आणतात.

jui gadkari serial thipkyachi rangoli
jui gadkari serial thipkyachi rangoli

जुईने या सर्व पर्यटकांची कानउघडणी करत तो कचरा स्वतःच्याच घरात फेका म्हणत संताप व्यक्त केला आहे. याबद्दल सविस्तर पोस्ट लिहिताना जुई म्हणते की, Be a good tourist… be a good citizen… Be a good Human निसर्गाची काळजी घ्या.. तरच निसर्ग आपली काळजी घेईल. I often see this.. people throw the trash where ever they feel like throwing! What stops u from throwing it in the dustbin?? It is heart breaking to see such beautiful places covered with plastic and other trash… guys be sensible or dont go to such places.. कचरा ईतरत्र टाकणं थांबवता येत नसेल तर प्लिज आपल्या घरात तो आवश्य फेका आणि त्यातच रहा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button