news

जाऊ बाई गावात शो ची हि स्पर्धक आहे या व्यक्तीच्या प्रेमात..

जाऊ बाई गावात या झी मराठीच्या शोने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ११ फेब्रुवारी रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. त्यात रमशा फारुकी हिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. पण रमशा जेवढी संयमीत खेळाडू म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकत होती त्याच जोडीला हळव्या मनाच्या श्रेजानेही गावकऱ्यांच्या मनात घर केले होते. श्रेजा म्हात्रे ही विजेती व्हावी अशी अनेक जणांची इच्छा होती. पण श्रेजा विजेत्या ट्रॉफीपासून खूप दूर असलेली पाहायला मिळाली. टॉप पाच मध्ये गेल्यानंतर श्रेजाला लगेचच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते तेव्हा तिचे चाहते नाराज झाले होते. श्रेजा ही मॉडेल आहे आणि तिला अभिनय क्षेत्रातही नशीब आजमवायचे आहे. त्यामुळे ती शो ची वीजेती ठरली नसली तरी अभिनेत्री म्हणून ती लवकरच मराठी सृष्टीत दाखल होईल अशी आशा आहे.

shreyja mhatre jau bai gavat
shreyja mhatre jau bai gavat

दरम्यान श्रेजाने विविध ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केलेले असून काही म्युजिक व्हिडिओत तिला काम करण्याची संधी मिळाली आहे. महेश मांजरेकर यांनीही श्रेजाच्या हळव्या बाजूमुळे तू मालिकेची नायिका बनू शकतेस असे म्हटले होते. काल व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना श्रेजाने तिच्या व्हॅलेंटाईन बद्दलही जाहीर केले. जितेन दादरकर हा श्रेजाचा बॉयफ्रेंड आहे. जितेन बिजनेसमन असून त्याला खाण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे. श्रेजा आणि जितेन हे दोघे गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. एमटीव्हीच्या ‘एनीथिंग फॉर लव्ह’ या शोमध्ये दोघांनी एकत्र कपल म्हणून पार्टीसिपेट केले होते. शोमध्ये दिलेले वेगवेगळे चॅलेंजेस त्यांनी सहज पार केले होते. श्रेजाला गाण्याची देखील आवड आहे.

व्हिडीओ क्रिएटर म्हणून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. जाऊ बाई गावात या शोमुळे श्रेजाच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. बावधन गावात कमल आजीसोबत तिचं भावनिक नातं जोडलं गेलं आहे. श्रेजा आता मुंबईला जाणार म्हणून कमल आजीने तिच्यासाठी चांदीची अंगठी आणि बांगड्या भेट म्हणून आणल्या होत्या. महाअंतिम सोहळ्यात या आजी नातीचं बॉंडिंग पुन्हा एकदा पाहायला मिळालं होतं. श्रेजा लवकरच लग्न करणार असे कमल आजीने म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button