जहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेच नव्या उद्योग क्षेत्रात पदार्पण… आई माझ्या व्यवसायातील प्रमुख कलाकार म्हणत
प्रसिद्ध क्रिकेटर जहीर खानची पत्नी तसेच अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या मराठमोळ्या सागरिका घाटगे हिने आता उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे. सागरिका घाटगे हिने नुकतेच तिचा साड्यांचा ब्रँड मार्केटमध्ये आणला आहे. महत्वाचं म्हणजे जाहीर खानने देखील हा ब्रँड सुरू करण्यासाठी सागरिका आणि तिची आई उर्मिला यांना पाठिंबा दिला आहे. चक दे इंडिया या चित्रपटातील एका महत्वपूर्ण भूमिकेसाठी ती ओळखली जाते. अलीकडेच तिने मुंबईच्या फोर सीझन्स हॉटेल मध्ये मॉडर्निस्ट मेंबर्स ओन्ली या क्लबमध्ये Akutee या ब्रॅंडचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यात आकुती ब्रँडमध्ये समावेश असलेल्या ऑर्डर सेट, दुपट्टे, जॅकेट, कुर्ता सेट आणि साड्यांचा संग्रह स्वतः सागरिका आणि तिची आई उर्मिला यांनी तयार केला आहे. हा ब्रँड सुरू करण्यामागे सागरिका आणि आई उर्मिला यांची मोठी मेहनत आहे. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत आकुती हा ब्रँड सागरिकाने आता बाजारात आणला आहे.
सागरिकाच्या आईला चित्रकलेची विशेष आवड आहे. उर्मिला यांनीच साड्यांवर फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. रॉयल टचमुळे तिच्या या आकुती ब्रँडच्या साड्यांना बाजारात विशेष मागणी आहे. राजेशाही घराण्यात जन्मलेल्या सागरिकाला हा ब्रँड बाजारात आणण्याचे कसे सुचले याबाबत ती म्हणते की, “माझा कौटुंबिक इतिहास ६०० वर्षांहून अधिक काळाचा आहे. मला आठवते की मी लहान असताना माझ्या पूर्वजांनी मोत्याच्या किंवा काचेच्या बांगड्यांसारख्या कमीत कमी दागिन्यांमध्ये शिफॉन आणि चंदेरी साड्या नेसल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला वाढताना मला नेहमी असं वाटायचं की, ‘मला मोठं व्हायचं आहे आणि त्यांच्यासारखं व्हायचं आहे’. त्यामुळे मला वाटतं, तिथूनच मला आकुतीची प्रेरणा मिळाली. आकुती याचा अर्थ राजकुमारी असा आहे. ” पुढे सागरिका असेही म्हणते की, “माझी आई नेहमीच खूप स्ट्रॉंग आणि स्वतंत्र विचारांची राहिलेली आहे आणि त्याचा माझ्यावर सर्वात मोठा प्रभाव पडला. तिच्या साडीवर नेहमीच अशी सुंदर फुलांची चित्रे असायची , कारण तिला बागकामाची खूप आवड होती, तिला फुलं काढण्याची आवड होती त्यातूनच ती व्यक्त होत होती.
त्यामुळे आई आणि मला वाटायचे की आपण असे काहीतरी तयार करू जे हाताने रंगवलेले असेल. पण त्यासाठी वेळ आणि कमीटमेंट आवश्यक होती पण आज असे वाटले की आपण आता त्यासाठी तयार आहोत. Akutee हे काळाच्या एक पाऊल मागे आहे. इतिहास आणि कलात्मकता जपण्याचा त्यातून प्रयत्न केला आहे. नेमके हेच आम्ही आमच्या ब्रँडद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझी आई ही या ब्रँडमागील मुख्य कलाकार आहे आणि तिने अनेक कलाकारांना तिचे स्ट्रोक फॉलो करून ती ज्या पद्धतीने रंगवते त्याप्रमाणे रंगविण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. आकुती हे रीगल फॅब्रिक्सने वेगळे केले जाते त्यातील प्रत्येक कापड हे तिच्या हाताने रंगवलेले आहे. माझ्या कुटुंबातील स्त्रियांनी परिधान केलेल्या कापडाचे हे कपडे आहेत ज्यात कॉटन सिल्क, चंदेरी आणि शिफॉन साड्यांचा समावेश आहे, परंतु आम्ही जॅकेट सारख्या आधुनिक कपड्यांचा देखील यात समावेश केला आहे.”