मराठी सृष्टीला भरभराटीचे दिवस आलेत असे चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. मालिका चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना चांगले मानधन मिळते याचाच एक भाग म्हणून कलाकार मंडळी आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झालेली पाहायला मिळत आहेत. चार चाकी गाडी घेणं असो वा मुंबई, पुणे आणि ठाणे सारख्या शहरात हक्काचं घर घेणं असो या गोष्टी अलीकडे मराठी सृष्टीत सर्रास पणे दिसून येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने तर कोरोनाच्या काळात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, समोर चौघुले, अरुण कदम अशा मातब्बर कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने हास्यजत्रा खऱ्या अर्थाने फुलवली.
गेली पाच वर्षे या कलाकारांनाही या शोने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. अशातच आता हास्यजत्राच्या कलाकारांना आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर करण्याचे काम या शोने केलेले आहे आणि म्हणूनच ही मंडळी आता चार चाकी गाडी ते घर खरेदी करताना दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियदर्शनी इंदलकर हिने गाडी खरेदी केली होती. त्यापाठोपाठ आता प्रसाद खांडेकर यानेही नुकताच नवीन घरात गृहप्रवेश केलेला आहे. प्रसाद खांडेकर याचे हे तिसरे घर आहे. मात्र जुन्या दोन्ही घरांनी त्याला नेहमीच भरभरून दिले.आपलं नवीन घर घेण्याचं अजून एक स्वप्न पूर्ण झालं…घर शोधायला१ वर्ष घर बांधायला ६ महिने आणि घर सजवायला २ महिने आणि शेवटी काल त्याने या नवीन घरात गृहप्रवेश केला. प्रसादचे हे नवीन त्याला हवे तसे त्याने सजवून घेतले आहे. घराच्या भिंती आणि इंटेरिअरसाठी पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या थीमला त्याने प्राधान्य दिले आहे.
दारावरची नेम प्लेट सुद्धा एकरेलीक फिल्म क्लिपबोर्ड प्रमाणे त्याने सजवली आहे. काल त्याने या नवीन घराची वास्तुशांती केली. यावेळी हास्यजत्राचे सर्वेसर्वा अमित फाळके, नम्रता संभेराव आणि गौरव मोरे यांनी हजेरी लावली होती. तर इतर सेलिब्रिटींनी सुद्धा प्रसादच्या या नवीन घराच्या बातमीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. प्रसादने महाराष्ट्राची हास्यजत्रासह चित्रपटातूनही काम केले आहे. नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका असा त्याच्या यशाच्या प्रवासाचा आलेख चढताच राहिला आहे. आयुष्याच्या ह्या सुंदर प्रसंगी आणि स्वप्नपूर्तीसाठी अभिनेता प्रसाद खांडेकर यांना आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा…