news

“हँसता हुआ नूरानी चेहरा काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा” लोकप्रिय गाण्यातील अभिनेत्री आता दिसते अशी.. मुलगी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

पारसमणी चित्रपटातील “हँसता हुआ नूरानी चेहरा काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा तेरी जवानी तौबा रे तौबा रे दिलरुबा दिलरुबा, दिलरुबा… ” हे गाणं आजही लोकप्रिय आहे. लता दीदींच्या आवाजातील हे गाणं चित्रित झालं होत प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री जीवनकला यांच्यावर. अभिनेत्री जीवनकला ह्यांचे आई आणि वडील दोघेही मूक चित्रपटात अभिनय साकारत होते. अभिनय साकारत असताना आई गंगुबाई आणि वडील दत्तात्रय कांबळे हे दोघेही पुण्यातील युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट मध्ये काम करत होते. २९ जून १९४४ रोजी दिवाकर वाड्यातील कांबळे कुटुंबात जीवनकला यांचा जन्म झाला. याच वाड्यात मंगेशकर कुटुंब देखील राहत होते. लता दिदींनीच त्यांच्या आईला जीवनकला हे नाव सुचवले होते.

jeevankala and ram kelkar wedding photo
jeevankala and ram kelkar wedding photo

लता दिदींनीच त्यांच्या आईला जीवनकला हे नाव सुचवले होते. हुजूरपागा शाळेत जीवनकला यांनी ६ वी पर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांनी बाळासाहेब गोखले यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले होते. घर लक्ष्मी रोडलगत असल्याने नृत्याचा सराव करताना एक दिवस मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांनी घुंगरांचा आवाज ऐकला आणि घरी येऊन चित्रपटात काम करणार का?अशी विचारणा केली. अखेर जमलं या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मंगेशकर कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्या नृत्य सादर करत असत. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत आल्यावर अकरावी पर्यतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

actress jevankala with daughter manisha kelkar
actress jevankala with daughter manisha kelkar

गुंज उठी शहनाई या गाजलेल्या हिंदी चित्रपटात अंखीयां भूल गई, गाण्यात नृत्य सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर किस्मत पलट के देख, सरस्वतीचंद्र, पुत्र व्हावा ऐसा, चिमण्यांची शाळा, हा माझा मार्ग एकला, वैशाख वणवा, शेरास सव्वाशेर, मराठा तितुका मेळवावा, काळी बायको अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून सहकलाकार, खलनायिका आणि नृत्यांगना अशा विविध भूमिकेतून त्या झळकल्या. जिथे सागरा धरणी मिळते, अखेरचा हा तुला दंडवत, हसता हुवा नुरानी चेहरा, रेशमाच्या रेघांनी अशी अनेक अजरामर गाणी त्यांच्यावर चित्रित झाली आहेत. १९६५ साली त्यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी सुलोचनाजींनी पटकथा संवाद लेखक राम केळकर यांचे लग्नासाठी स्थळ सुचवले. १९६९ साली जीवनकला या राम केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

manisha kelkar with mother jeevankala kelkar
manisha kelkar with mother jeevankala kelkar

लग्नानंतर जीवनकला यांनी अभिनयाला राम राम ठोकला. योगेश, हेमंत आणि मनीषा ही त्यांची तीन अपत्ये. आज हेमंत एडिटर, रायटर असून सुभाष घई यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो, तर त्यांची मुलगी मनीषा केळकर ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. मानिषाने भोळा शंकर, बंदूक, झोल, लॉटरी, अशा हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे. परंतु मनिषाला एक अभिनेत्री म्हणून आपल्या आई इतके यश मिळवता आले नाही. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या जीवनकला यांनी मात्र नृत्याची आपली आवड आजही जपलेली पाहायला मिळते. आजही जीवनकला त्यांचे कथ्थक आणि लोकनृत्याचे क्लासेस चालवतात हे विशेष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button