marathi tadka

राणादाने घेतल घरातील ह्या खास व्यक्तीसाठी बर्थडे गिफ्ट… कारची किंमत ऐकून व्हाल अवाक

झी मराठीवरील जाऊ बाई गावात ह्या शो नंतर अभिनेता हार्दिक जोशी तुझेच मी गीत गात आहे मालिकेत पाहायला मिळात आहे. आजवर कितीही मालिका केल्या कितीही शो केले तरीही हार्दिक जोशीला अजूनही राणाच्या भूमिकेसाठीच ओळखलं जातं. त्याच कारण देखील तसंच खास आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर हिने खऱ्या आयुष्यात देखील २०२२ साली राणाशी म्हणजेच हार्दिक जोशी सोबत लग्नगाठ बांधली. राणा आणि अंजली म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी आजही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. आजही ह्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अल्पावधीतच त्यावर लाखो चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतो.

hardeek joshi buy a new car
hardeek joshi buy a new car

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत हार्दिक एक महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे याचं जोडीला त्याचे दोन आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. एवढंच नाही तर हार्दीकने कोल्हापूर मध्ये राणादा थंडाई नावाने व्यवसाय सुरू केला होता या व्यवसायात आणखी भर म्हणून त्याने शेगावची खास कचोरी विकण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस हार्दिक जोशी अभिनय क्षेत्राच्या जोडीला व्यवसायात देखील यशस्वी ठरत आहे त्याचमुळे काल त्याने एका खास व्यक्तीसाठी भली मोठी रक्कम मोजून गाडी खरेदी केली आहे. काल २९ मार्च रोजी हार्दिकच्या वडिलांच्या वाढदिवशी त्याने त्याच्या वडिलांना महिंद्रा suv ७०० हि कार गिफ्ट केली आहे.

hardeek joshi family photo
hardeek joshi family photo

महिंद्राच्या ह्या SUV ७०० ची ऑनरोड किंमत तब्बल २७ लाख रुपये इतकी आहे. हे महागडे गिफ्ट खरेदी करताना अक्षया देवधर, हार्दिक जोशीचा भाऊ, सोबतच त्याचे आईवडील आणि पुतणी सुद्धा उपस्थित होती. वडिलांसाठी गिफ्ट केलेली ही महागडी गाडी पाहून अनेकांनी हार्दीकचं कौतुक केलं आहे. आणि हार्दीकच्या या यशस्वी वाटचालीसाठी चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button