मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन संपून बरेच दिवस झाले आहेत मात्र तरीही हे स्पर्धक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. इतके दिवस झाल्यानंतरही काही ना काही कारणास्तव ही मंडळी एकमेकांनच्या भेटीगाठी घेताना दिसतात. सूरज चव्हाण या शोचा विजेता ठरला. त्याच्या गावी जाऊन आम्ही त्याला भेटणार असे प्रत्येकानेच शब्द दिला होता. बहुतेकांनी हा शब्द पाळलेला दिसून आला. सूरज लवकरच त्याच्या नवीन घरात गृहप्रवेश करणार आहे पण जुनं घर पाडण्याअगोदर या सगळ्यांनी त्याच्या घरी आवर्जून भेट दिली. जान्हवी किल्लेकर, पुरुषोत्तम दादा पाटील, अंकिता वालावलकर हे त्याच्या घरी आले होते.
तर घनश्यामने देखील खास कारणास्तव या सगळ्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. २५ तारखेला घनश्यामचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी तो मुंबईला गेला होता. अरबाज आणि निक्कीची त्याने एकत्रित भेट घेतली आणि वाढदिवसाचे आमंत्रण दिले. त्यानंतर घनश्याम जान्हवी किल्लेकरच्या घरी गेला. जान्हवीला तिच्या कुटुंबासह त्याने वाढदिवसाला आमंत्रण दिलं आहे. जान्हवीला भेटताच घनश्यामने तिला ९ लाखांचं काय केलंस? असा पहिलाच प्रश्न विचारला. बिग बॉसच्या फिनाले मध्ये जान्हवीने ९ लाखांची बॅग घेऊन शोमधून एक्झिट घेतली होती. त्या ९ लाखांचं काय केलंस असा प्रश्न घनश्यामलाही पडला. त्यावर जान्हवी उत्तर देताना थोडीशी शांत झाली. आणि त्याला म्हणाली की, त्या पैशांचं मी अजून काहीच नाही केलं, ते पैसे आहे तसेच अकाउंटमध्ये ठेवले आहेत.
तिच्याकडून हे उत्तर मिळाल्यानंतर घनश्याम मात्र शांत झाला. त्याची उत्सुकता इथेच मावळलेली पहायला मिळाली. पण पुढे नंतर त्याने सुरजच्या घरी आलीस आणि माझं गाव जवळ असूनही मला भेटली नाहीस म्हणून नाराजी बोलून दाखवली. पण आता वाढदिवसाला तरी तुला यावंच लागेल म्हणत घनश्यामने जान्हवीला आमंत्रण देऊन तिचा निरोप घेतला. बिगबॉसच्या घरात एकदा जान्हवी योगिताला म्हणाली होती “माझं लग्न खूप लवकर झालं वयाच्या २२ व्या वर्षी मला मुलगाही झाला.पण यामुळे मी आता माझं करिअर करण्यासाठी पूर्णपणे मोकळी झाली आहे. मुलगा झाला तो आता मोठा होतोय. मला लग्नासाठी थांबायचं नाही आणि मुलासाठीही आता थांबायचं नाही मी पूर्णपणे फ्री आहे .आता हे सगळं त्याच्या फ्युचरसाठीच चाललं आहे. तो आता ३ रीतच शिकतोय पण त्याला फॉरेनमध्ये जायचंय तिथल्या युनिव्हर्सिटीत शिकायचंय”. कदाचित मुलाच्या भविष्यासाठीच ती हे पैसे साठवून ठेवत असेल असं अनेकांचं मत आहे.