marathi tadka

गौतमी पाटील पुन्हा झळकणार मराठी चित्रपटात….जबरदस्त लूकमुळे सर्वत्र तिचीच चर्चा

येत्या १८ ऑक्टोबर रोजी “लाईक आणि सबस्क्राईब ” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, अमेय वाघ, शुभंकर तावडे, पुष्करराज चिरपुटकर असे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या चित्रपटात गौतमी पाटील सुद्धा झळकणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात ‘लिंबू फिरवलं..’ हे आयटम सॉंग असणार आहे. यात गौतमीचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्यामुळे गौतमी पाटील सोबत थिरकण्याची संधी मिळाल्याने अमेय वाघ भलताच खुश झाला आहे.

limbu firavl gautami patil and amey wagh song
limbu firavl gautami patil and amey wagh song

गौतमीची या गाण्यात साजेशी एन्ट्री होत आहे. या गाण्यासाठी अगोदर अनेकांचा विचार करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता तिलाच हे गाणं का देऊ नये म्हणून विचार केला गेला. या गाण्यात गौतमीने उत्तम डान्स केलाय असे अमेय म्हणतो. जे काही रिटेक झाले ते माझ्यामुळे झाले अशीही तो प्रामाणिकपणे कबुली देतो. “गौतमी पाटील लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप लोकप्रिय आहे. तिला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात, पत्र्यावर, झाडावर चढतात…म्हणून ही संधी तीला देण्यात आली. ” असे अमेय सांगतो. दरम्यान लिंबू फिरवलं या गाण्याची एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांना तिने घायाळ केलेलं पाहायला मिळत आहे.

याअगोदर घुंगरू या चित्रपटातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर मात्र सफशेल आपटलेला पाहायला मिळाला होता. मध्यंतरी गौतमीला मराठी बिग बॉसची ऑफर देखील मिळाली असल्याचे बोलले गेले होते. पण कार्यक्रमांचे बुकिंग अगोदरच झाले असल्याने गौतमीने बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिला होता. पण आता तिच्या याच चाहत्यांसाठी ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अर्थात तिला या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली नसली तरी या आयटम सॉंगमुळे ती नक्कीच चाहत्यांची मनं जिंकून घेईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button