कधी कधी अचानक काही गोष्टी समोर येतात तेव्हा एक आश्चर्यकारक प्रतिक्रिया आपसुकच दिली जाते. अतुल परचुरे, शरद पोंक्षे, महेश मांजरेकर असे कलाकार मीडियापासून दूर होते पण जेव्हा ते मिडियासमोर आले तेव्हा त्यांची खालावलेली तब्येत पाहून अनेकांना गहिवरून आले. अशाच काही प्रतिक्रिया एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बाबतीत दिल्या जात आहेत. अभिनेता सुशांत शेलार हा याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पण सुशांत हे कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात.
देऊळ बंद, दुनियादारी, मोकळा श्वास, अंड्या चा फंडा, क्लासमेट्स, मॅटर, विजेता या आणि अशा कितीतरी चित्रपटातून सुशांतने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सुशांत शेलार हा गेली काही वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर आहे पण असे असले तरी तो राजकारणाची धुरा सांभाळताना दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या चित्रपट सेनेचा तो अध्यक्ष आहे. या क्षेत्रात व्यस्त असताना तो त्याच्या कार्याची माहिती सोशल मीडियावर कायम देत असतो.
यातूनच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यात सुशांत शेलारची खालावलेली तब्येत पाहून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. एवढा बारीक का झालास? तब्येत का खराब झाली? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. सुशांतच्या प्रकृती बद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.