नुकतेच दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या नवीन घराची वास्तूशांती केली. डोंबिवली बाहेरील दावडी या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. नवीन घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत रवी जाधव यांनी स्वप्नपूर्ती पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. रवी जाधव यांच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. भावाने रिक्षा चालवून घर संसाराला हातभार लावण्याचे काम केले. यातूनच रवी जाधव यांनी कलासृष्टीत जम बसवण्याचा निर्णय घेतला.
टाईमपास , बालक पालक, न्यूड सारख्या चित्रपटाने रवी जाधव यांना मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली. आज त्यांच्या या स्वप्नपूर्ती निमित्त सेलिब्रिटींनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. या स्वप्नपूर्ती बद्दल रवी जाधव म्हणतात की, “डोंबिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सूरू झालेला आमचा दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथवर येऊन पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायला सज्ज झाला आहे. आमच्या नव्या घराच्या वास्तूशांतीचे हे काही खास क्षण. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती !!! ❤️”
ह्या आजवरच्या प्रवासात पत्नी मेघना जाधव हिने मोलाची साथ दिल्याचं ते म्हणतात. इथवरच प्रवास करणं मेघना शिवाय अशक्य होत तिची साथ मिळाली म्हणूनच इथवर पोहचलो असं ते आवर्जून सांगतात.