धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्याच्या अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार… गाडीची किंमत पाहून थक्क व्हाल
९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट “धडाकेबाज” आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दीपक शिर्के यांच्या मैत्रीची हि कहाणी आणि त्यांना साथ दिली ती अभिनेत्री अश्विनी भावे आणि अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी. अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी सध्या ठरलं तर मग ह्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलेले आहे. उत्कृष्ट कथानक आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे ही मालिका आपले यश आजही टिकवून ठेवून आहे. मालिकेतील मुख्य कलाकारांइतकेच सहकलाकार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. पहिल्या क्रमांकाची मालिका म्हणून या मालिकेतील कलाकारांना चांगले मानधन सुद्धा मिळते.
मालिकेमुळे अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांनाही आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर केलेले पाहायला मिळाले आहे. नुकतेच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने चक्क मर्सिडीज गाडी खरेदी करून हा आनंद द्विगुणित केला आहे. कल्पना सुभेदार म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी ही महागडी गाडी खरेदी करण्याचा मान पटकवलेला आहे. मर्सिडीज बेंझ equa हि गाडी त्यांनी खरेदी केली आहे ह्या गाडीची बेसिक प्राईझ तब्बल ६२ लाखांपासून सुरु होते. मराठी इंडस्ट्रीत खूप कमी कलाकार आहेत ज्यांनी याअगोदर महागडी गाडी खरेदी करण्याचा मान मिळवला आहे. सई ताम्हणकर, रसिका सुनील, मंदार जाधव, स्वप्नील जोशी, भरत जाधव यांच्याकडे आलिशान गाड्या आहेत. या यादीत आता प्राजक्ता कुलकर्णी यांचीही भर पडलेली पाहायला मिळत आहे. प्राजक्ता कुलकर्णी यांनी मर्सिडीज खरेदी करताच अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी कमेंट करत लॉंग ड्राइव्हला जाण्याची मागणी केली आहे. प्राजक्ता कुलकर्णी या गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत.
धडाकेबाज या गाजलेल्या चित्रपटात त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका बनण्याची संधी मिळाली होती. त्यानंतरही शहीद, भाई कोतवाल आणि बऱ्याच चित्रपट मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या. राजन दिघे यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांचा मुलगा जय याला फोटोग्राफीची विशेष आवड आहे. ठरलं तर मग या मालिकेमुळे प्राजक्ता कुलकर्णी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. त्यांनी साकारलेली अर्जुनच्या आईची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली आहे. डिसेंबर महिन्यात ठरलं तर मग ही मालिका एक वर्षाचा टप्पा यशस्वीपणे पार करत आहे. या एक वर्षाच्या कालावधीत मालिकेने खूप मोठे यश मिळवले आहे. त्याचमुळे ही कलाकार मंडळी आपली स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.