देवमाणूस मालिकेतील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल…बेशुद्धावस्थेत असल्याने ती सतत तिच्या आईला हाक मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री आहे नीलम पांचाळ. नीलम पांचाळ ही माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम मिहीर राजदा याची बायको आहे. मिहीर आणि नीलम या दोघांनी हिंदी मालिकांसह मराठी सृष्टीतही स्वतःची ओळख बनवली आहे. वैजू नंबर १, देवमाणूस २ या मालिकेत नीलम छोट्याशा भूमिकेत झळकली होती. पण आता आरोग्याच्या कारणास्तव तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधला एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत असून तिचे चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. नीलम बेशुद्धावस्थेत असल्याने ती सतत तीच्या आईला हाक मारत आहे. त्यामुळे चाहते अधिकच चिंतीत वाटले होते. पण ही एक छोटीशी सर्जरी असल्याने डॉक्टरांनी भूल दिली असल्याचे स्पष्टीकरण त्यावर देण्यात येत आहे. दरम्यान मिहीरनेही सोशल मीडियावर काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. ही फक्त एक छोटीशी सर्जरी आहे आणि निलमला भूल देण्यात आली आहे असे व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यात येत आहे. त्यामुळे चाहते आता या प्रतिक्रियेवर निश्चित झाले आहेत. दरम्यान निलमने स्वतःची काळजी घ्यावी असाही तिला सल्ला दिला जात आहे.
रामायणातील जनक राजा म्हणून प्रसिद्ध असलेले “मूलराज राजदा” हे प्रसिद्ध अभिनेते, लेखक सर्वांच्या परिचित आहेत. हिंदी, गुजराथी भाषिक अनेक चित्रपट आणि नाटके त्यांनी साकारली. लोकप्रिय रामायण मालिकेत त्यांनी राजा जनक यांची भूमिका साकारली होती. विक्रम वेताळ, महाभारत या मालिकेत त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या. त्यांच्या पत्नी इंदुमती राजदा या देखील अभिनेत्री आहेत. मन, खिचडी, साराभाई vs साराभाई, इन्स्टंट खिचडी, या मालिका आणि चित्रपटातून इंदुमती यांनी काम केले होते. नुकतेच मिहिरची पत्नी नीलमने सोशल मीडियाच्या माध्यमातून मूलराज राजदा यांना पुण्यतिथीदिनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझे आजोबा आणि सासरे’ असे कॅप्शन देऊन तिने ही माहिती शेअर केली होती.