news

देऊळ बंद चित्रपटातील ही चिमुरडी आठवते? आता दिसते खूपच सुंदर

२०१५ मध्ये प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. स्वामी समर्थांची महती आणि चित्रपटातील सुरेल गाणी आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. या चित्रपटाचा सिकवल म्हणजेच ‘देऊळ बंद२’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यामुळे येत्या काही दिवसातच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान या चित्रपटात पुन्हा एकदा देऊळ बंद चित्रपटाची टीम पाहायला मिळेल असे बोलले जात आहे, पण यात राघवशास्त्री नसणार हे गश्मीरने एका मुलाखतीत म्हटले आहे.

aarya ghare deool band fil actress
aarya ghare deool band fil actress

कारण देऊळ बंद २ हा चित्रपट शेतकऱ्यांवर आधारित असणार आहे त्यामुळे यात राघवशास्त्री तुम्हाला दिसणार नाही, असे स्पष्टीकरण गश्मीरने दिले होते. पण देऊळ बंद २ चित्रपटात राघव शास्त्रीची मुलगी सना दिसणार का? असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. याबद्दल लवकरच खुलासा होईलच पण तूर्तास आता ही सना नेमकी कशी दिसते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे.

aarya ghare marathi actress
aarya ghare marathi actress

सना हे पात्र बालकलाकार आर्या घारे हिने साकारले होते. आर्या घारे ही मूळची पुण्याची आहे. देऊळ बंद चित्रपटात राघव शास्त्रीला आस्तिक बनवण्यात तिचाही मोठा वाटा होता. देऊळ बंद चित्रपटानंतर आर्या ग्रेट माय इंडिया, बंदिशाळा, अ ब क अशा चित्रपटात झळकली आहे. आर्याने तिचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. केवळ अभिनय क्षेत्रात काम करत न राहता आपण या समाजाचं काही तरी देणं लागतो या हेतूने ती अनेकदा वृक्षारोपण, अनाथालयाला भेट असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असते . या कामाला तिने अध्यात्माचीही जोड दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button