news

एवढ्या लहान वयात तिचं बालपण हरवत चाललंय….मायराच्या आई वडिलांवर होतेय टीका

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ ही बालकलाकार लवकरच तिच्या एका चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परेश मोकाशी यांचा ‘ नाच गं घुमा’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यात मायरा मुक्ता बर्वेच्या मुलीची भूमिका साकारत आहे. खरं तर अभिनय क्षेत्रात तिला यायचं होतं पण देवाने जसा मार्ग ठरवलाय तसं ती पुढे जात आहे असे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते. याच जोडीला मायराकडे आणखी एक आनंदाची बातमी आहे. मायराची आई श्वेता वायकुळ या प्रेग्नंट आहेत. त्यामुळे मायरा आता मोठी ताई होणार असे तिला एक सरप्राईज देण्यात आले आहे. हा क्युट व्हिडिओ नुकत्याच तिच्या इन्स्टाग्रामवर तिने शेअर केला आहे.

myra vaikul family photo
myra vaikul family photo

मी ताई होणार हे सरप्राईज पाहून मायरा खूपच खुश झाली ‘पण मी कोणाची ताई होणार?’ असा निरागस प्रश्न तिला यावेळी पडलेला पाहायला मिळाला. तिचा हाच क्युट अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे. पण एकीकडे मायराचे कौतुक होत असताना तिच्यावर टीका देखील करण्यात येऊ लागली आहे. मायरा वायकुळ हिचे आईवडील दोघेही उच्छशिक्षित. मायरा जेव्हा काहीच महिन्यांची होती तेव्हापासून तिची आई तिचे क्युट व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. यातून मायरा एक्सप्रेशन क्वीन म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. तिची हीच लोकप्रियता पाहून तिला एका चित्रपटात काम करण्यासाठी संधी मिळाली. पण काही कारणास्तव तिचा हा पहिला चित्रपट रखडला गेला. त्यानंतर मायरा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. अर्थात या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. पण आता दोन मालिका, चित्रपट अशा तिच्या ग्लॅमरस दुनियेच्या प्रवासात ती तिचे बालपण गमावून बसलीये अशी तिच्यावर टीका होऊ लागली आहे.

myra vaikul photos
myra vaikul photos

मायराने दिलेल्या मुलाखती देखील ‘ती खूपच मोठी झाल्यासारखी वागते बोलते’ अशी तिच्यावर टीका केली जात आहे. ‘याला सर्वस्वी तिचे आईवडील जबाबदार आहेत असे या टिकाकारांचे म्हणणे आहे. एवढ्या कमी वयात ती तिचं बालपण गमावतीये, तिच्या आईवडिलांनी तिला प्रसिद्धीच्या झोतात यावे म्हणून रिल्स बनवून घेतले. त्यामुळे ती आता मोठ्या मुलींसारखी वागू लागली आहे असे टीकाकारांनी मत व्यक्त केलं आहे. मायराचे इन्स्टाग्राम अकाउंट तिची आईच हँडल करत असते. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी मायराला असं वागायला शिकवलं असं नेटकरी म्हणत आहेत. तर काही लोक तिला बालकामगार नाही का असा प्रश्न उपस्थित करत आहेत. कलाकार म्हटलं की सोशल मीडियावर टीका, कौतुक या गोष्टी सहन कराव्याच लागतात. पण आता ही एवढूशी चिमुरडी सुद्धा अशा टीकेची धनी झाली आहे. अर्थात जिथे प्रसिद्धी येते तिथे या गोष्टी येतात असेच आता म्हणावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button