news

माझ्या लग्नाला तसा माझ्या सासर कडून कडकडून विरोध होता मला कायम… कुशलची मजेशीर पोस्ट होतेय व्हायरल

चला हवा येऊ द्या मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके त्याच्या सहजसुंदर अभिनयाने एक उत्तम विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. एकांकिकेतून अभिनय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या कुशलला त्याच्या पत्नीची वेळोवेळी साथ मिळाली होती. खरं तर एका नाटकाच्या तालमीनीमित्त सुनयना आणि कुशल एकत्र आले होते. तेव्हापासूनच हे दोघे एकमेकांना आवडू लागले. कुशलला नोकरी करण्यापेक्षा अभिनय क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं होतं. त्याची हीच मनातली गोष्ट सूनयनाने हेरली होती. अगदी तिकीटापूरतेही पैसे नसणाऱ्या कुशलच्या खिशात सुनयना तिच्या जवळचे पैसे टाकायची. तू तुझी आवड जोपास हा तिचा विश्वास त्याला आज ह्या यशापर्यंत घेऊन आला. सूनयना आणि कुशल दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत हे तिच्या घरच्यांना समजले होते. तेव्हा त्यांच्या लग्नाला त्यांनी विरोध दर्शवला होता. कुशलकडे नोकरी नव्हती आर्थिक दृष्टीने तो स्थिरस्थावर देखील नव्हता.

kushal badrike photo
kushal badrike photo

शिवाय सूनयना त्याच्यापेक्षा उजवी ठरली होती. पण कुशलने नोकरी करण्याचे आश्वासन दिले आणि घरच्यांचा विश्वास जिंकला तेव्हा त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यात आली होती. पण लग्नानंतर महिनाभरातच कुशलने त्याच्या नोकरीला राजीनामा देऊन आपला आवडता छंद पुन्हा जोपासला. हे सांगण्याचे कारण म्हणजे कुशलने त्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण किती हँडसम दिसत आहोत हे त्याला म्हणायचे होते. अर्थात लग्नाचा किस्सा इथे आठवताना कुशल म्हणतो की, “ही post सत्य घटने वर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासर कडून, कडकडून विरोध होता, मला कायम असं वाटत राहील की माझं दिसणं हेच त्याला कारणीभूत असेल . आता हे photos हाती लागे पर्यंत मी ह्याच “गैर समजुतीत” होतो . हे photos मला मिळाले त्या क्षणी मी सुनयना कडे तडक गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो “ ह्या मुलाला तुम्ही नाकारल होतं, ह्या अश्या दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी” ? सुनयना मला शांतपणे म्हणाली की “ तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटी चे आलेत. मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा “गैरसमज” संपूर्ण दूर झाला ! खरच… technology काय develop झाली आहे यार, कॅमेरे चांगले आलेत market मधे. (सुकून) Sanjay Mandhare तुझा कडचा camera भारी आहे .”

chala hawa yeu dya actor kushal badrike
chala hawa yeu dya actor kushal badrike

कुशलने शेअर केलेले फोटो पाहून अनेकांनी त्याचं मोठं कौतुक केलं आहे. अतुल सिधये यांनी कुशलचे अनेकदा फोटो काढले आहेत. कुशलचे लग्न सुद्धा त्याच फोटोवर जुळले होते अशी एक आठवण त्याने इथे करून दिली. अतुल सिधये यांनी कुशलला तू माणूस म्हणून उत्तम आहेस हे सांगताना म्हटले आहे की, अरे तू नुसता चेहेऱ्या ने च नाही रे , तर मनानी ही नितांत सुंदर आहेस. पण तुझ्या सारख्या तनामनानी सुंदर असणाऱ्या मॉडेल चे फोटो काढायला कॅमेरा बरोबरच फोटोग्राफर चे मन ही तेवढेच सुंदर असावे लागते. आणि कॅमेराचा पुढे आणि मागे दोन्हीकडे असे सुंदर कलाकार उभे राहिले ना की फोटो असे आपसूकच कमाल येतात रे. By the way ……. मला आत्ता उमजले की तुझे फोटो काढायचे धाडस माझ्यात का नाहीये ते. कारण नुसते मॉडेल सुंदर असून तर चालत नाही ना . कॅमेरा च्या मागे तनामनानी एकाच रंगाचा ( काळा ) माणूस असेल. तर त्या फोटोत इतके सुंदर रंग कुठून येणारं ???? पण शप्पत सांगतो बेटा. खरच खूप सुंदर फोटो आहेत तुझे. कुशलच्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button