बॉलिवूड म्हटलं की इथे एका विशिष्ट समुदायाचा प्रभाव आहे असे म्हटलं जातं. पण कपूर, खन्ना, खान याही पलीकडे जाऊन काही कलाकारांनी खलनायकाच्या भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख इथे जपलेली पाहायला मिळाली. खलनायक हा नायक नायिकेइतकाच महत्वाचा असतो हे त्यांनी दाखवून नव्हे तर सिद्ध करूनच दिलेलं होतं. आज अशाच काही खलनायकांच्या खाजगी आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. बॉलिवूडच्या या ७ खलनायकांना खऱ्या आयुष्यात मात्र मराठी मुलींनी मोहिनी घातलेली होती याचं तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मराठी मुली वडीलधाऱ्या लोकांचा आदर करतात आणि काहीं प्रसंगात नवऱ्याची साथ देतात अशी कितीतरी वक्तवे बॉलीवूड कलाकारांनी ह्यापूर्वी केली आहेत ह्याच कारणामुळे मराठी मुलींसोबत लग्न करायला कलाकार पसंती दर्शवत असत.
अमरीश पुरी हे बॉलिवूड सृष्टीतील टॉपचे खलनायक म्हणून ओळखले जात होते. मिस्टर इंडिया, कोयला, करण अर्जुन , नगीना अशा चित्रपटातून त्यांच्या नजरेतला करारेपणा पाहूनच अंगाला थरकाप व्हायचा. कालांतराने त्यांनी शिस्तबद्ध बाबूजींच्याही भूमिका साकारल्या. पण बऱ्याचजणांना माहीत नसेल की अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर या मराठी मुलीसोबत लग्न केले होते. मुंबईच्या एका इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना दोघांचे प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
राहुल देव हा बॉलिवूड चित्रपट सृष्टीचा आणखी एक दमदार खलनायक. चॅम्पियन, शापित अशा ९० च्या दशकातील चित्रपटात त्याने व्हीलनच्या भूमिका गाजवल्या. रिना देव या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तो मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसे हिच्या प्रेमात पडला. गेली अनेक वर्षे हे दोघेही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.
मुरली शर्मा यानेही बॉलिवूडसह मराठी, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत खलनायकाची भूमिका साकारलेली आहे. २००९ साली त्याने अभिनेत्री अश्विनी कळसेकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. आशुतोष राणा यांनीही बॉलिवूड चित्रपटातून खलनायकाच्या भूमिका गाजवल्या आहेत. संघर्ष, दुष्मन चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. मराठमोळ्या रेणुका शहाणे सोबत काम करताना त्यांचे प्रेम जुळून आले. आणि स्वतःच पुढाकार घेऊन त्यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली.
राज बब्बर यांनीही कधीकाळी खलनायकाच्या भूमिका गाजवलेल्या होत्या. एक पत्नी आणि अपत्ये असतानाही ते स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले होते. घरच्यांचा विरोध झुगारून त्यांनी स्मिता पाटील सोबत लग्नही केले. पण स्मिताच्या जाण्याने त्यांचा हा संसार अल्पावधीचाच ठरलेला पाहायला मिळाला. स्मिताचा मुलगा प्रतीक पाटील बब्बर आता बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावताना पाहायला मिळत आहे.
शक्ती कपूर यांनीही खलनायक म्हणून बॉलीवूड सृष्टीचा एक काळ गाजवला होता. कालांतराने त्यांनी विनोदी भूमिकांकडे आपला मोर्चा वळवला. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पद्मिनी कोल्हापूर हिची बहीण शिवांगी कोल्हापूरे हिच्या ते प्रेमात पडले. घरच्यांचा या लग्नाला विरोध असतानाही त्यांनी हे लग्न जुळवून आणले होते.
करण राजदान हे बॉलीवूड फिल्म मेकर, दिग्दर्शक, लेखक तसेच अभिनेता म्हणून ओळखले जातात. हिंदी मालिका तसेच चित्रपटातून ततानी कधी मुख्य भूमिका तर कधी खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या होत्या. रजनी या लोकप्रिय मालिकेत काम करत असताना अभिनेत्री प्रिया तेंडुलकर सोबत त्यांची ओळख झाली. १९८८ मध्ये त्या दोघांनी प्रेमविवाह केला.
अभिनेते आशुतोष राणा यांनी बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवला. अनेक बॉलीवूड चित्रपटात त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारल्या बॉलीवूड अभिनेत्री रेणुका शहाणे हिच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नापूर्वी त्या सुरभि, सर्कस, खिचडी अश्या प्रसिद्ध हिंदी मालिकांत झळकल्या होत्या. रेणुकाची आई शांता गोखले लेखिका आणि चित्रपट समीक्षक आहेत.