मराठी बिग बॉसचा पाचवा सिजन सोशल मीडिया स्टार्समुळे चांगलाच गाजलेला आहे. काल या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी आर्या जाधव, वैभव चव्हाण, अभिजित सावंत आणि इरिना रुडाकोव्हा हे चार सदस्य नॉमिनेट झाले. त्यामुळे आता या चौघांवर टांगती तलवार पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिजित सावंतने स्वतःसाठी स्टॅण्ड घेतला त्यामुळे प्रेक्षक मला घाटातून बाहेर जाण्यासाठी नक्कीच वाचवतील असा त्याला विश्वास आहे. तर वैभव नॉमीनेट व्हावा अशी त्याची ईच्छा होती. पायात क्रॅम्प आल्यामुळे अभिजीतला चालणे कठीण होते मात्र तरीही तो अरबाजशी संगनमताने वैभवला नॉमिनेट करू शकला. दरम्यान वैभवने त्याच्या चाहत्यांना वोट करण्यासाठी विनंती केली आहे. ” ५ वा आठवडा चालू झाला आहे पण विषय असा आहे की मी नॉमीनेट झालोय..तुम्हाला मला वाचवायचंय त्यासाठी तुम्ही भरभरून वोट करा.
पुढच्या आठवड्यातच काय पूर्ण सिजन मला पुढे घेऊन जा आणि टॉपला नेऊन सोडा”. अशा आशयाचा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वैभव बिग बॉसच्या घरात नसून एका वेगळ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड आहे असेच मत व्यक्त करण्यात येत आहे. यागोदरही अशा काही उदाहरणांवरून बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड वाटलेला आहे. विकेंड वॉर किंवा भाऊच्या धक्क्यावर हे कलाकार जेव्हा येतात तेव्हा त्यांचा जो गेटअप असतो तोच गेटअप करून ते सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. हे सदस्य बिग बॉसच्या घरातच असतात पण मग त्यांचे डोक्यावरचे केस एकदम टकटकमद्धे कोण कापतं? असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो.
शिवाय मुलींचे आयब्रोजही अगदी आखीवरेखीव असतात. जर बिग बॉसच्या घरातून हे सदस्य बाहेर जात नाहीत, कुणाच्याही संपर्कात राहत नाहीत तर असे बदल कसे होतात? असे प्रश्न सामान्य जनतेला भिडसावताना दिसत आहेत. याबद्दल असं उत्तर देण्यात येत की बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदरच हे सदस्य हॉटेलमध्ये ड्रेसअप करून त्याचे शूट करून ठेवत असतात. आणि त्यांचा मोबाईल मॅनेजर कडे देतात. असे असेल तर त्या ठराविक दिवशी अगदी तोच मेकअप आणि तेच दागिने त्यांच्याकडे कसे असतात? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. पण एक मात्र खरं की कितीही जीव तोडून सांगा की ‘हा स्क्रिप्टेड शो नाही..’ पण जाणकार प्रेक्षकांना तुम्ही फसवू शकत नाही.