news

बिग बॉसच्या घरातून या सदस्याची एक्झिट…सूरजला यावेळीही प्रेक्षकांनी केलं सेफ

मराठी बिग बॉसच्या घरातून आज तिसऱ्या आठवड्यात एका सदस्याची एक्झिट झाली आहे. त्यामुळे पुढील दिवसांत सदस्यांमध्ये एक तगडी टक्कर पाहायला मिळेल. या आठवड्यात दिल्या गेलेल्या टास्कमध्ये ए टीम विजेती ठरली होती. त्यातील अरबाजला बिग बॉसच्या घरातला कॅप्टन बनण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम पाटील यांची घरातून एक्झिट झाली होती. तर दुसऱ्या आठवड्यात नो एलिमीनेशनमुळे कोणीही घराबाहेर गेले नाही. सूरज, योगिता, अभिजित आणि निखिल हे चार सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच दोन सदस्य डेंजर झोनमध्ये असल्याची हिंट रितेशने दिली होती.

ritesh deshmukh in bhaucha dhakka bigboss
ritesh deshmukh in bhaucha dhakka bigboss

एक्सस कार्यात कोण आपल्या जवळचं आणि कोण लांबचं यावरून हे नॉमिनेशन पार पडले. या चौघांमधून निखिल किंवा योगिता बाहेर जातील अशी प्रेक्षकांना खात्री होती. सुरजची लोकप्रियता पाहता तो सेफ झोनमध्ये असणार याची खात्री असल्याने प्रेक्षक निश्चिंत होते. दरम्यान डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्याचे नाव जाहिर करण्यात आले. सूरज सेफ असल्याने योगिता आणि निखिल दामले यांच्यावर टांगती तलवार होती. शेवटी निखिल दामले बिग बॉसमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. निखिल गेल्यामुळे घरात थोडं नाराजीचं वातावरण होतं. पण असे असले तरी आज निखिल गेल्याने एक प्रकारे ही स्पर्धा टफ झाली असल्याचे दिसून येते.

bigboss marathi nikhil damle exit
bigboss marathi nikhil damle exit

निखिल घरातून बाहेर पडल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर सोशल मिडियावरच्या कमेंट्स वाचण्यात आल्या. कोणाची इमेज बाहेर कशी तयार झाली याबद्दल मतं मांडण्यात आली. अरबाजला लई माज होता त्याच्या ताकदीपुढे सूरज वरचढ ठरला अशा आशयाची कमेंट घरातील सदस्यांना आश्चर्यकारक वाटली. या कमेंटवर सगळे हसतात. पण अरबाजनेही त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button