मराठी बिग बॉसचा शेवटचा आठवडा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तिकीट टू फिनाले टास्कमध्ये निक्की तंबोळीने फिनालेचं पहिलं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे टॉप ५ मध्ये कोणकोणते सदस्य येतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या आठवड्यात ग्रँड सेलिब्रेशन पार पडत आहे. शिव ठाकरेने या सोहळ्याला हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांचा आतापर्यंतचा बिग बॉसच्या घरातील प्रवास कसा होता त्यांना प्रेक्षकांकडून किती प्रेम मिळतंय याची जाणीव त्यांना करून देण्यात येणार आहे. त्यामुळे फिनालेमध्ये कोण बाजी मारणार याची धाकधूक सगळ्यांना लागून राहिली आहे. पण मराठी बिग बॉसचा फिनाले रितेश देशमुख शिवाय पार पडणार का?. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण जवळपास दोन आठवडे रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर गैरहजर राहिला. अजूनही तो फ्रान्समध्ये शूटिंग पूर्ण करतोय अशी एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे रितेश बिग बॉसच्या फिनालेला नसणार असे बोलले जात आहे. रितेशने बिग बॉसमधून काढता पाय घेतला का? त्याचमुळे तो दोन आठवडे दिसला नाही असेही त्याच्या बाबतीत बोललं जात आहे. रितेश ऐवजी बिग बॉसचा फिनाले कोण होस्ट करणार? असे प्रश्न समोर असताना याही वेळी निलेश साबळे ही धुरा सांभाळणार का हे लवकरच समोर येईल. कारण ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉसचा फिनाले पार पडत आहे. रितेशने फिनालेचं शूटिंग पूर्ण केलंय आणि त्यानंतरच तो फ्रान्सला गेला असेही समोर येत आहे.
हिंदी बिग बॉसच्या कारणास्तव मराठी बिग बॉसचा शो आटोपता घेण्यात आला. त्यामुळे रितेशने फिनालेचं शूटिंग पूर्ण केलं अशीही एक चर्चा आहे. कारण तो फ्रान्समध्ये जाण्याअगोदरच अभिजित सावंत विजेता झाला अशी एकच बातमी व्हायरल झाली होती. बिग बॉसचा फिनाले ज्यांनी पाहिला त्यांनी ही बातमी लिक केली असे म्हटले गेले. त्यामुळे आता अभिजित सावंत हा शो जिंकणार की दुसऱ्या सदस्याला ट्रॉफीचा मान मिळणार यात किती तथ्य आहे हे ६ ऑक्टोबरलाच समोर येईल.