मराठी बिग बॉसच्या प्रसारण वेळेत ३ दिवसांसाठी बदल… तर रविवारी या तारखेला होणार सिजनचा ग्रँड फिनाले
१०० दिवसांचा बिग बॉसचा शो आता अवघ्या ७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यात आता भर म्हणून की काय नव्या मालिकेसाठी चक्क बिग बॉसलाच वेळेत बदल करावा लागत आहे. मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन अगोदरच्या ४ सिजनपेक्षा चांगला गाजतोय असा दावा वाहिनीने हेड केदार शिंदे यांनी केला होता. ४ सिजनपेक्षा यंदाचा सिजन प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवत आहे असे त्यांनी म्हटले होते. पण त्यानंतर लगेच १०० दिवसांचा हा शो ७० दिवसात आटोपणार असे घोषित करण्यात आले.
गेल्या आठवड्यात रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावरून गायब झाला तर याही आठवड्यात तो दिसेनासा झाला. त्यामुळे ट्रोलिंगला घाबरून रितेश बाजूला गेला असे बोलले जाऊ लागले. पण रितेश हाऊसफुल्ल 5 चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्रान्सला गेला आहे. त्यामुळे तो आता थेट बिग बॉसच्या फायनलमध्येच पाहायला मिळेल असे बोलले जात आहे. दरम्यान हिंदी बिग बॉस सुरू होत असल्याने मराठी बिग बॉसचा ५ वा सीजन आटोपता घेतला जात आहे. त्यामुळे फिनालेचं शूटिंग आटोपूनच रितेश फ्रान्सला गेला असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण हिंदी बिग बॉससाठी त्याच ठिकाणी नवीन सेट उभारला जाणार आहे. त्यात आता अभिजित सावंत विजेता झाला असल्याचेही अनेकांनी जाहीर केले आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या ३ ऑक्टोबर पासून रात्री ९ वाजता आई तुळजाभवानी ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेमुळे बिग बॉसच्या प्रसारणाच्या वेळेत बदल होत आहे. तीन दिवसांसाठी बिग बॉस रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रविवारी ६ ऑक्टोबर रोजी या सिजनचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. अभिजित सावंत विजेता होईल असे अनेक माध्यमांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अभिजित विजेता झालेला बघायला नक्कीच आवडणार आहे.