आज मराठी बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावर खेल खेल में या हिंदी चित्रपटाची टीम पाहुणे म्हणून हजर राहिली होती. तेव्हा अक्षय कुमारने घरातील सदस्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. सुरजच्या झापुक झुपुक स्टाईलवर रितेश आणि अक्षय कुमार थिरकलेले पाहायला मिळाले. कालच्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने जान्हवीची खरडपट्टी काढली. वर्षा उसगावकर यांच्याशी वाद आणि त्यांना मिळलेल्या पुरस्कारावर तिने आक्षेप घेतला होता. तेव्हा मेघा धाडेने सोशल मीडियावर जान्हवीच्या वागण्यावर रोष व्यक्त केला. याबद्दल रितेशने जान्हवीला जाहीर माफी मागायला लावली. रितेशने जान्हवीची चुगली जाहीर केली तेव्हा मात्र जान्हवी रडता रडता अस्वस्थ झाली.
पण त्यानंतर ती पुन्हा बिग बॉसच्या समोर दाखल झाली. तर आर्याच्या मोबाईलमधले काही सिक्रेट मेसेजेस अक्षयच्या हाती लागले तेव्हा आर्या टेन्शनमध्ये आली. सूरज बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा झाडू मारताना दिसतो. तेव्हा रितेशने त्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. ‘तू पहिला असा सदस्य आहेस जो बिग बॉसच्या घराला आपलं घर मानतो’ असे म्हणत तो सुरजच्या चेहऱ्यावर हसू खुलवतो. सूरज या शोचा विजेता व्हावा अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. या आठवड्यातही तो नॉमिनेट झाला पण प्रेक्षक त्याला घरातून बाहेर जाण्यापासून नक्कीच वाचवतील असा विश्वास आहे. त्यामुळे सूरज या आठवड्यातही सेफ झालेला पाहायला मिळाला. पॅडी, योगिता, घनश्याम, निखिल, निक्की आणि सूरज हे सहा सदस्य या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेला सामोरी गेली. पण या आठवड्यात ‘नो नॉमिनेशन’ म्हणत रितेशने सगळयांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
यासोबतच एक आनंदाची बातमीही शेअर केलेली पहायला मिळाली. मराठी बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सगळ्या सीजनपेक्षा हा पाचवा सिजन सर्वात जास्त रेटिंग मिळवताना दिसला आहे. त्यामुळे चारही सिजनचा रेकॉर्ड या पाचव्या सिजनने मोडीत काढले आहेत. कलर्स मराठी वाहिनीचे हे एक मोठे यश म्हणावे लागेल. कारण झी मराठी स्टार प्रवाह सारख्या तगड्या वाहिन्यांना या पाचव्या सिजनने चांगली टक्कर दिली आहे. या सिजनची प्रेक्षकांमध्येही मोठी चर्चा पहायला मिळत आहे. सोशल मीडिया स्टार्सची ही कमाल आहे का असा तर्क अगदी तंतोतंत खरा ठरल्याचे दिसून येते. कारण अंकिता, सूरज आणि डीपी यांनी हा सिजन सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत ठेवलेला पाहायला मिळतो आहे.