
फार्महाऊस ही संकल्पना आता सर्वत्र रूढ होऊ लागली आहे. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून एका निवांत क्षणी राहावं अशी इच्छा सर्वांचीच असते. त्याचमुळे सोयीनुसार लोक गावी किंवा शहरापासून थोड्याशा अंतरावर फार्महाऊस उभारू लागले आहेत. मराठी सृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या फार्महाऊसचं स्वप्न पूर्ण केलं. अशातच आता मराठी बिग बॉसचा सदस्य अशीच स्वप्नपूर्ती पूर्णत्वास येण्याच्या प्रतीक्षेत आहे. मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनमध्ये वैभव चव्हाण सहभागी झाला होता.

मूळचा बारामतीचा असलेला वैभव त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. झी मराठीच्या मन झालं बाजींद या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकला. त्यानंतर बिग बॉसच्या शोने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. बिग बॉसच्या घरात तो काहीसा ट्रोल देखील झाला पण हा एक खेळाचा भाग म्हणून लोकांनी त्या इग्नोर केल्या. याच शोमध्ये इरिना सोबत त्याची खास मैत्री झाली शो नंतरही त्यांनी ही मैत्री तशीच टिकवून ठेवली आहे.

अशातच वैभव चव्हाण याने गावाकडे फार्महाऊस उभारण्याचं स्वप्न पाहिलं. त्याचं हे सपना हळूहळू आकार घेऊ लागलं आहे. वैभव गावी असलेल्या शेतात एक मोठं, ऐसपैस घर बांधत आहे. या घराच्या भिंती पूर्ण तयार झाल्या असून अजून बरंच काम शिल्लक आहे. येत्या काही दिवसात त्याचं हे फार्महाऊस दिमाखात उभं राहिलेलं पाहायला मिळेल. हे घर उभारण्यासाठी वैभव मोठी मेहनत घेताना दिसतो. त्याची ही स्वप्नपूर्ती लवकरच पूर्णत्वास येवो हीच एक सदिच्छा!