मराठी बिग बॉस गाजवल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची नवी इनिंग… सेलिब्रिटींकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
बिग बॉस मराठी सीझन ३ मधील लोकप्रिय चेहरा मीरा जगन्नाथ हिने नुकतीच उद्योजिका म्हणून एका नवीन प्रवासाला सुरूवात केली आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तिने तिची ‘मिरामी’ नावाची इव्हेंट कंपनी लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून चाहत्यांना तसेच प्रेक्षकांना ती उत्तम, दर्जेदार कार्यक्रम भेटीस आणणार आल्याची खात्री देते. मिराच्या आतापर्यंतच्या सर्वच कलाकृतींना चाहत्यांनी भरभरून साथ दिली. यापुढेही तिला अशीच साथ मिळेल अशी तिने आशा व्यक्त केली आहे. तुमच्या लाडक्या मीरा जगन्नाथच्या ‘मिरामी’ ला सुद्धा असंच कायम प्रेम देत राहा अशी तिने तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे.
मीराने या नव्या व्यवसायाबद्दलचा तिचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. एका इंस्टापोस्टवरून तिने तिच्या नवीन व्यवसायाच्या पदार्पणाची घोषणा केली आहे. “मिरामी द्वारे लवकरच तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट, दर्जेदार कार्यक्रम घेऊन येत आहे. मला आशा आहे की तुम्ही माझ्या सर्व कलाकृतींना पाठिंबा देत राहाल. तुम्ही दिलेली मोलाची साथ. तुमच्या लाडक्या मीरा जगन्नाथच्या ‘मिरामी’ लाही असेच प्रेम देत राहा. सोबत रहा….” असे म्हणतात मिरावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये मिराने स्पर्धक म्हणून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मीराची लोकप्रियता त्यानंतर खूपच वाढली होती. मिरामी द्वारे मीरा आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालणार आहे. या इव्हेंटद्वारे ती तिचा पहिला कार्यक्रम म्हणजे “दिवाळी पहाट” हा सांगीतिक कार्यक्रम दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात येणार आहे.
दिवाळी पहाट हा कार्यक्रम विशेष आहे कारण यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात संगीतकार महेश काळे दिसणार आहेत. येत्या ११ नोव्हेंबर रोजी, शनिवारी हा कार्यक्रम ठाणे शहरात आयोजित करण्यात येणार आहे. ठाण्याच्या सांस्कृतिक शहरात मिरा तिच्या इव्हेंटमधून हा पहिला कार्यक्रम आयोजित करत आहे त्यामुळे सांस्कृतिक शहरातील प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या जगात एक उद्योजीका म्हणून आपला प्रवास सुरू करण्याचा मीराचा हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. मीरा इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये गेम चेंजर बनेल आणि उच्च दर्जाचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या समोर आणेल अशी आशा आहे.