news

अशोक सराफ यांच्या मुलाची वेगळ्या क्षेत्राकडे वाटचाल…नुकताच स्वीकारला नव्या पदाचा भार

अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सृष्टीतील एक मोठं प्रस्थ म्हणून मानलं जातं. या दोघांनी आजवर अनेक कलाकृतीतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. निवेदिता सराफ तर छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख मिरवत आहेत. त्यांच्या बऱ्याचशा चाहत्यांना आजही वाटतं की त्यांच्या मुलानेही अभिनय क्षेत्रात काहीतरी करायला हवं होतं. पण असे न करता त्याने करिअर म्हणून एका वेगळ्या क्षेत्राची वाट धरलेली पाहायला मिळाली. अनिकेत हे अशोक आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाचं नाव. खरं तर शाळेत असल्यापासूनच अनिकेत हा कविता करायचा. पुढे त्याने एक लघुपट देखील बनवला होता. पण एक दिवस त्याने शेफ बनण्याची इच्छा व्यक्त केली.

ashok saraf son aniket saraf photo
ashok saraf son aniket saraf photo

तू कुठल्याही क्षेत्रात काम कर अशी घरातूनच मुभा असल्याने त्याने हा मार्ग निवडला होता. त्यासाठी पॅरिसमध्ये त्याने एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते. पॅरिसमध्ये जायचं म्हणून अनिकेतने फ्रेंच भाषा शिकून घेतली होती. सचिन पिळगावकर यांच्या एका मित्राने त्याला खूप मदत केली होती. उत्तम शेफ झाल्यानंतर अनिकेतने काही काळ परदेशातच नोकरी देखील केली. केक आणि पेस्ट्रीज बनवण्याचे प्रशिक्षण त्याने लंडनध्ये केले. पण आता अनिकेतने करिअर म्हणून आणखी एक नवीन मार्ग निवडलेला पाहायला मिळतो आहे. नुकताच अनिकेतने दक्षिण युक्रेन मधील मरीऊपोल या शहरातील ऑक्सफर्ड इंग्लिश सेंटर येथे ESL Teacher (English as a Second Language Teacher) या शिक्षक पदाचा भार सांभाळला आहे.

aniket saraf with ashok and nivedita
aniket saraf with ashok and nivedita

त्यासाठी अनिकेतने सगळीकडून कौतुक केले जात आहे, आणि या नवीन वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देखील मिळत आहेत. अनिकेत हा निक सराफ या नावाने सोशल मीडियावर ओळखला जातो. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून तो त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. मध्यंतरी त्याने परदेशी नाटकातून एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यामुळे उत्तम शेफ असण्यासोबतच तो अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावताना दिसला. पण आता इंग्लिश टीचर म्हणून तो स्वतःची एक वेगळी ओळख बनवताना दिसत आहे. या नवीन प्रवासासाठी अनिकेतचे खूप खूप अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button