news

मुग्धा गोडसेच नाही तर हिंदी सृष्टी गाजवणारी ही मराठी अभिनेत्री सुद्धा राहते लिव्हइन मध्ये…लग्न न करताच एकत्र राहण्याचा निर्णय

लिव्हइन रिलेशनशिप ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. ग्लॅमरस दुनिये पाठोपाठ आता सामान्य माणसाच्या आयुष्यातही या गोष्टी घडू लागल्या आहे. अनेक तरुण तरुणी आता लग्नागोदरच त्यांच्या पार्टनर सोबत लिव्हइन मध्ये राहतात. सिद्धार्थ चांदेकर आणि गायक रोहित राऊत यांनीही त्यांच्या आयुष्याचा हा किस्सा उलगडला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत मुग्धा गोडसे हिनेही एक नाव कमावलं आहे. बॉलिवूड अभिनेता राहुल देव सोबत ती गेल्या १२ वर्षांपासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. पण मुग्धा गोडसेच नाही तर हिंदी मालिकेतील आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुद्धा गेली २२ वर्षे लिव्हइन मध्ये राहत आहे. अर्थात आम्हाला लग्न करण्याची आवश्यकता वाटत नाही असेही तिने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे. ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे अश्लेषा सावंत.

actress ashlesha sawant
actress ashlesha sawant

अश्लेषा सावंत ही गेली अनेक वर्षे हिंदी मालिका सृष्टीत लोकप्रियता मिळवत आहे. पुण्यात जन्मलेल्या अश्लेषाला कॉलेजमध्ये असल्यापासूनच मॉडेलिंगचे वेध लागले होते. बालाजी टेलिफिल्म्स साठी तिने ऑडिशन दिली त्यात तिला एकता कपूरच्या क्या हादसा क्या हकीकत या मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. कसौटी जिंदगी की, क्यूँ की सास भी कभी बहु थी, कमल, कहीं तो होगा, कुमकूम भाग्य, अलिफलैला अशा अनेक लोकप्रिय मालिकेत तिला महत्वपूर्ण भूमिका मिळत गेल्या. अनुपमा या लोकप्रिय मालिकेत तिने बरखाची भूमिका साकारली , जाही दिवसांपूर्वीच तिने या मालिकेत दिसणार नसल्याचे जाहीर केले होते. गेल्या २२ वर्षांपासून अश्लेषा एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लिव्हइन मध्ये राहत आहे. संदीप बसवाना असं या अभिनेत्याचं नाव आहे. २०२२ मध्ये क्यूँकी सास भी कभी बहु थी या मालिकेत या दोघांनी दिर भाऊजयची भूमिका साकारली होती.

ashlesha sawant photos
ashlesha sawant photos

मालिकेत एकत्रित काम करत असतानाच दोघांचे प्रेम जुळून आले. अश्लेषा राहायला लांब असल्याने ती संदीप बसवानाच्या घरी राहू लागली होती. एक आठवड्याचा पुढे एक महिना झाला तेव्हा अश्लेषाला संदीप सोबत राहायला आवडू लागले. त्यानंतर हे दोघेही लिव्हइन मध्ये राहू लागले. अर्थात लग्न करण्याचा अजूनही त्यांनी विचार केलेला नाही. याबद्दल संदीपचं स्पष्ट मत आहे की तुम्ही एकमेकांसोबत सुखी असाल तर लग्न करायची काय गरज आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला खुश ठेवतोय तुमची काळजी घेतोय एकमेकांना समजून घेतोय तिथे लग्नाचा प्रश्नच येत नाही. अश्लेषाच म्हणणं देखील असच आहे, पण आपल्या पालकांच्या इच्छेखातर कधीतरी मंगळसूत्र गळ्यात घालावं अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button