मालिका निरोप घेणार म्हणता म्हणता पुन्हा नवीन ट्रॅकवर आणली….गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीच्या नव्या मालिका टीव्ही माध्यमात पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाह वाहिनी, कलर्स मराठी आणि झी मराठीची जणू त्यासाठी चढाओढच सुरू आहे. पण असे असूनही केवळ प्रेक्षकांच्या प्रतिसादाखातर त्यांच्या आवडत्या मालिकेत नवे ट्रॅक सुरू करण्यात येत आहे. इतके दिवस झी मराठीवर नवीन मालिका येणार म्हणून अप्पी आमची कलेक्टर ही मालिका निर्णायक वळणावर आणून ठेवली होती.
मालिका निरोप घेतेय असे समोर असताना मात्र आता या मालिकेत नवीन ट्रॅक सुरू करण्यात आला आहे. अमोलवरचे संकट टळले असून संकल्पलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र यावेळी तो पुन्हा येणार असल्याची धमकी देत आर्याला एक सूचक ईशारा देताना दिसतो. त्यामुळे आता पुढील काही दिवसातच या संकल्पचा आर्यासोबत मिळून एक नवा प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान अर्जुन आणि अप्पी पुन्हा एकत्र यावेत आणि सिंबा बरा व्हावा आणि योग्य वेळेत मालिका संपवावी असे म्हटले गेले. पण या चिमुरड्याच्या लोकप्रियते खातर मालिका अशीच सुरू ठेवण्यात आली. फक्त लक्ष्मी निवास मालिकेमुळे तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांनी ठरवलं तर मालिका चालू राहू शकते हे आता स्पष्ट झालं आहे.