news

साफसफाई चपला उचलणे त्याने का करावे? बिग बॉसच्या घरात सुरजला दिलेली वागणूक पाहून भडकला अभिनेता

मराठी बिग बॉसचे सोशल मीडियास्टार्समुळे चांगलेच गाजलेले पाहायला मिळत आहे. धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण या सेलिब्रिटींनी बिग बॉसच्या घरात खरे मनोरंजन केले आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. याच स्टारमुळे आम्ही हा शो बघतोय असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सिजनला मोठी लोकप्रियता मिळताना दिसत आहे. दरम्यान मला बिग बॉसचा शो समजला नाही, इथं काय करायचं असतं अशा गोंधळात सूरज वावरताना पाहायला मिळाला. परवानगी नसतानाही निक्की तांबोळी बेडवर बसली म्हणून सूरज वर्षा उसगावकर यांच्याजवळ ही तक्रार करू लागला पण यामुळे सुरजला निक्कीचा ओरडा खावा लागला.

suraj chavan in bigboss home
suraj chavan in bigboss home

आधीच गोंधळात असलेला सूरज निक्कीच्या वागण्यामुळे अधिकच बिथरलेला दिसला. तेव्हा बिग बॉसने सुरजचे बळ वाढवण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसच्या सहानुभूतीनंतर सूरज गुलगत बनून त्याच्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर आला तेंव्हा त्याच्या साधेपणाचे सगळ्यांनीच कौतुक केले. पण सुरजला बिग बॉसच्या घरात दुय्यम वागणूक दिली जात आहे असे मत चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवेने दिली आहे. भांडी घासता येत नाही म्हणून अंकिता रडून ड्रामा करू लागली तेव्हा सुरजला दोन वेळची भांडी घासावी लागली.

ankur wadhave on suraj chavan
ankur wadhave on suraj chavan

याबद्दल अंकुरने नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, “दोनही टाइम चे भांडे, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीततरीही सूरज ने का कराव? सूरज सारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शो मधे या सगळ्यांच प्रतिनिधित्व करतोय तरीही सगळ्याना आपला गेम खेळायचा आहे पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील कदाचित ह्यात तो अडकलाय. बाकी लोकना भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सुरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, शिंपथी यावर मी बोलू शकत नाही एवढी माझी समज नही माझी.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button