news

“मी ह्यातून काढता पाय घेते, माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात”…सुरजच्या भेटीनंतर अंकिता सुरजमध्ये बिनसलं

साधारण दोन दिवसांपूर्वी अंकिता वालावलकर सुरजची भेट घेण्यासाठी त्याच्या बारामती येथील मोढवे गावी गेली होती. यावेळी अंकिताचा होणारा नवरा कुणाल देखील सोबत होता. तेव्हा अंकिताने सुरजच्या घरी चटणी, भाकर खाल्ली. सोशल मीडियावर सूरज आणि अंकिताने या भेटीचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता सुरजच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातले व्हिडीओ आणि फोटो डिलीट झाले आहेत. सुरजने या संदर्भात सगळ्या चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. पण यामुळे अंकिता मात्र दुखावली आहे. सुरजला पोस्ट टाकता येत नाहीत, त्याचे सोशल अकाउंट जवळच्या व्यक्ती हँडल करतात.

ankita walawalkar in suraj chavan village
ankita walawalkar in suraj chavan village

त्यामुळे अंकिताने आता या सगळ्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता सुरजच्या जवळ नकोय अशा आशयाचे काही मेसेजेस तिच्यापर्यंत पोहोचले ते पाहून अंकिता म्हणते की ” हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!..पण एक शेवटचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते सुरजचं अकाउंट सूरज हँडल करत नाही…सुरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. ह्यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात. धन्यवाद!”. अंकिता पुढे असेही म्हणते की, “आम्ही त्याच्यासाठी जोपर्यंत त्याचा आमच्यावर विश्वास राहील तोपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करत राहू…पण त्याने माणसं ओळखायला शिकलं पाहिजे हे निश्चित…कोणाचेही ऐकून डोक्यात ग्रह करून राहिल्यास काम करायलाही उत्साह राहत नाही”. अशी तिने नाराजी व्यक्त केली आहे.

ankita walawalkar and suraj chavan news
ankita walawalkar and suraj chavan news

दरम्यान अंकिताने सुरजला फोन केला तेव्हाही तिचे त्याच्याशी बोलणे होत नव्हते ही आठवणही या नाराजीत दिसून आली. बिग बॉसच्या घरात असताना अंकिता सुरजला मदत करणार असे बोलली होती. पण आता ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याची खंत या भावनेत दिसून येत आहे. त्यामुळे सुरजने स्वतः माणसं ओळखायला शिकायला हवं असं मत अंकिताने व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button