news

ते सगळ्यांना १०० रुपयांचे पाकीट द्यायचे पण आम्हा तिघींच्या पाकिटात… तेव्हापासून आम्ही रक्षाबंधन करणं सोडलं

आज रक्षाबंधन, बहीण भावाच्या नात्याचा एक गोड क्षण. हा क्षण बिग बॉसच्या घरातही अनुभवायला मिळाला. अबीर गुलाल या मालिकेची टीम बिग बॉसच्या घरात दाखल झाली होती. तेव्हा सुरजला राखी बांधण्यात आली. तर आज अंकिताने रक्षाबंधनाचा एक किस्सा इथे शेअर केलेला पहायला मिळाला. अंकिताला दोन बहिणी आहेत. मी माझी रक्षाबंधन घरात येण्यापूर्वीच साजरी केली अशी ती यावेळी सांगते. पण असे करण्यामागचे कारण तिने इथे सांगितले आहे. ” आम्ही तिघी बहिणी आहोत. लहानपणी खूप वाटायचं की आम्हाला भाऊ असावा.

ankita walawalkar with sisters family photo
ankita walawalkar with sisters family photo

रक्षाबंधनाला त्याला राखी बांधावी, नंतर आम्हाला गिफ्ट्स मिळावे असं त्यावेळी खूप वाटायचं. म्हणून मग आम्ही आमच्या जवळच्या भावांना राखी बांधू लागलो. ते सगळ्यांना १०० रुपयांचे पाकीट द्यायचे, पण आम्हा तिघींच्या पाकिटात ते ३० रुपयेच टाकायचे. त्यांची परिस्थिती चांगली असूनही ते असे करायचे. आम्ही असं का म्हणून विचारलं की ते म्हणायचे तुम्ही तिघी बहिणी म्हणून तुमच्यावर खूप खर्च होतो. तेव्हा खूप वाईट वाटायचं. मग तेव्हापासून आम्ही रक्षाबंधन करायचं सोडून दिलं. आता आम्ही तिघी बहिणी एकमेकींना राखी बांधतो. या रक्षाबंधनला माझ्या लहान बहिणींनी आधीच राखी बांधली होती ती मी अजूनही काढलेली नाही.”

पुढे अंकिता म्हणते की, “गरजेचं नाही की भाऊ आहे म्हणून तो तुम्हाला बघेल. मी मोठी बहीण आहे आणि मी माझ्या दोन्ही बहिणींना सांभाळते.कुठल्याही बाबतीत त्यांना काही कमी पडू देत नाही. त्यामुळे माझ्याकडन त्या सगळया बहिणींना ज्यांना भाऊ नाही त्यांना असे अनुभव आलेत त्या सगळयांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ नसला तरी तुम्ही स्ट्रॉंग बना , तुम्ही सगळं करू शकता!”..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button