news

4 वर्षानंतर आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर … आई कुठे काय करते मालिका अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री

अभिनय क्षेत्रात काम करत असलेले कलाकार आता राजकारणातही नशीब आजमावताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळाले. अशातच आता आई कुठे काय करते मालिकाफेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गटाचा झेंडा हाती घेतला आहे. अश्विनी महांगडे या गेली अनेक वर्षे मालिका, चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. पण आता ‘महाराष्ट्र प्रदेश नॅशनलिस्ट महिला काँग्रेस पार्टी’ शरद पवार गटाच्या उपाध्यक्ष पदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर डॉ अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अश्विनी महांगडे यांनी ही जबाबदारी स्वीकारली.

ashvini mahangade enter in shadchadra gat
ashvini mahangade enter in shadchadra gat

अश्विनी महांगडे यांची पार्श्वभूमी थोडीशी राजकीयच म्हणावी लागेल. अश्विनी महांगडे या मूळच्या वाई तालुक्यातील पसरणी या गावच्या. त्यांचे वडील प्रदीपकुमार महांगडे गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या निधनापश्चात आता त्यांची लेक अश्विनी यांनीही राजकारणाची वाट धरली आहे. राजकारणातील या प्रवेशाबद्दल त्या म्हणतात की, ” माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे. पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल.

ashwini mahangade and amol kolhe news
ashwini mahangade and amol kolhe news

हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार..राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button