news

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक…गंभीर आजाराशी झुंज अखेर अयशस्वी

मराठी चित्रपट, मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अमित खेडेकर याला मातृशोक झाला आहे. अमितच्या आई सौ सुनीता खेडेकर या गेल्या काही काळापासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. या गंभीर आजाराशी त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. १५ मे रोजी रात्री १२.३० च्या सुमारास सुनीता खेडेकर यांनी वयाच्या ६० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे खेडेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अमित खेडेकर आणि पत्नी रश्मी अनपट दोघेही या बातमीने दुःखी झाले आहेत. अमितने त्याच्या आईच्या आठवणीत भावूक होताना म्हटले आहे की, ” ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंब दुःखाच्या छायेत आहे. तिच्या जवळच्या लोकांपलीकडेही माझ्या आईच्या प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक समुदयावर पसरला आहे.

amit khedekar with mother sunita khedekar
amit khedekar with mother sunita khedekar

ती नेहमी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी, दुःखात गरजुना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या निःस्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनात स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक अमिट छाप सोडली. खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. या कठीण काळात आमच्यासोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना.” म्हणत अमितने आईप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.

amit khedekar mother death news
amit khedekar mother death news

अमित खेडेकर आणि रश्मी अनपट हे दोघेही कलाकार दांपत्य सध्या दुःखाच्या छायेत आहेत. दरम्यान रश्मी अनपट ही लवकरच कलर्स मराठीच्या अंतरपाट या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर अमित खेडेकर याने काही दिवसांपूर्वीच कन्यादान मालिकेला निरोप दिलेला पाहायला मिळाला होता. मराठी सृष्टीत हे दोघे गेली अनेक वर्षे स्थिरस्थावर असलेले पाहायला मिळतात. रश्मी अनपट हिने तर कित्येक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत तर अमितने देखील चित्रपट मालिकेतून सहाय्यक भूमिका निभावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button