मराठी बिग बॉस विजेत्याच्या घराचं इंटेरिअर पाहिलं का….८ वर्षे भाड्याच्या घरात राहिल्यानंतर स्वतःच्या घराचं स्वप्न झालं पूर्ण
आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेचजण खूप उत्सुक असतात. सोशल मीडियाचे मध्यम चाहत्यांना आणि कलाकारांना जवळ आणण्याचे एक माध्यम बनले आहे. अशाच माध्यमातून हे कलाकार आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत असतात. महत्वाचं म्हणजे स्ट्रगल करत असताना मुंबईत घर घेण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून असतात. अनेकांची ही स्वप्न आता सत्यात उरलेली आहेत. त्यात अभिनेता आणि मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनचा विजेता अक्षय केळकर याचेही घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अक्षय केळकरला म्हाडाच्या घराच्या सोडतीत लॉटरी लागली होती. त्यावेळी त्याने त्याच्या नवीन घराची बातमी चहत्यांसोबत शेअर केली होती.
अक्षय केळकरने त्याच्या या पहिल्या वहिल्या घराला आकर्षक इंटेरिअर करून घेतलं आहे. अक्षयने बिग बॉसच्या घरात त्याच्या नावाची असलेली पाटी प्रवेशद्वारावरच सजवली आहे. आकर्षक प्रवेशद्वार, इंटेरिअरसाठी त्याने ब्राऊन व्हाइट रंगांची थीम निवडली आहे. महत्वाचं म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीसाठी त्याने एक खास जागा बनवली आहे. सोबतच एका भिंतीवर वारकऱ्यांच्या प्रतिकृती सजवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, लाकडी झोपाळा आणि बरंच काही त्याच्या या घरात त्याने सजवलं आहे. घराच्या या स्वप्नाबद्दल अक्षय म्हणतो की, “खरं तर मुंबई ही लोकांना स्वप्नांवर जगवते. मोठं, छान जगायचं स्वप्न …छान जगण्यासाठी डोक्यावर छप्पर असण्याचंही स्वप्न…गेले ८ वर्ष मित्रांसोबत भाड्याने राहताना मीही हे स्वप्न पाहिलं.
आणि आज तुम्हा सागळ्यांच्या आशीर्वादाने हे स्वप्न पूर्ण झालं. माझं पहिलं घर तेही आता मुंबईत तयार झालंय. इथला प्रत्येक कोपरा मी मनापासून सजवलाय. जेव्हा केव्हा मी शूटिंगमधून थकून भागून घरी येतो तेव्हा घराचं दार उघडल्या उघडल्या मला क..मा..ल… वाटतं!…आणि ही जी काही फिलिंग आहे ना ही फिलिंग बाप्पाला मी नेहमी सांगतो की प्रत्येकाच्या वाट्याला येऊ दे “…म्हणत त्याने त्याच्या या घराची खा झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अक्षय केळकर हा २०११ पासून मराठी सृष्टीत काम करतो आहे. सध्या स्टार प्रवाहवरील अबीर गुलाल मधील त्याची मुख्य भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.