news

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीनंतर कलाकारांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह….अजिंक्यने सांगितली सत्य परिस्थिती

चित्रपट असो किंवा मालिका त्यासाठी कलाकारांना दिवसाचे १२-१२ तास तर कधी १६ तासही काम करावं लागत असतं. कामाच्या या पद्धतीवर आजवर अनेक कलाकारांनी त्यांचं मत अगदी मोकळेपणाने मांडलं आहे. सुकन्या कुलकर्णी यांनीही या मुद्द्यावर अनेकदा त्यांचं मत स्पष्ट केलं होतं. एवढे तास काम करून पुन्हा घर संसाराची जबाबदारी, तासंतास प्रवास अशा असंख्य गोष्टींना तोंड देत ही कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असतात. वेळी अवेळी जेवण आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्याने कलाकारांच्या शारीरिक स्वास्थ्यावर देखील याचा परिणाम होत असतो. काही दिवसांपूर्वीच नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेल्या सागर कारंडे यालाही असा अनुभव आला होता. प्रकृतीच्या कारणास्तव नाटकाचा प्रयोग रद्द करून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते.

shreyas talpade with bollywood actors
shreyas talpade with bollywood actors

तर आताचीच ताजी घटना म्हणजे श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका आला म्हणून एकच काळजी व्यक्त करण्यात आली. ज्या दिवशी श्रेयसला अस्वस्थ जाणवू लागलं त्यादिवशी दिवसभर तो वेलकम टू जंगल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. रात्री घरी आल्यानंतर श्रेयसची प्रकृती खालावली असल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यावेळी त्याच्या छातीत ब्लॉक आढळले त्यामुळे तातडीने त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या घटनेनंतर कलाकारांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. कलासृष्टीतुनही कलाकारांनी यावर मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच अभिनेता अजिंक्य राऊत याने आरजे सोनालीला मुलाखत दिली. त्यात त्याने या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा असेही म्हटले आहे. अजिंक्य राऊत म्हणतो की, “पहिल्यांदा श्रेयस दादासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करू.

shreyas talpade marathi actor
shreyas talpade marathi actor

तो आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. मीच नाही तर आम्ही सगळेचजण त्याला खूप मानतो. आपण स्वतः मनोरंजन क्षेत्रात आहोत म्हणून आपलंही मनोरंजन होतं असं मुळीच नसतं. आपल्याकडे पण असे नियम यायला हवेत जे परदेशात आहेत. कलाकारांना १२ तास काम करावं लागतं पण कधी कधी तेरा तास, चौदा तास असेही काम करून घेतले जाते तेव्हा तुला या कामाचे हजार, दोन हजार रुपये अधिकचे दिले जाततात ना! असं बोललं जातं. आर्टिस्ट आणि टेक्निकल टीमकडे काम करण्याचा हा जो बेभानपणा असतो ती त्यांच्यातली एक उत्कटता असते. त्यावर कोणाचं तरी नियंत्रण असावं किंवा असा काही नियम बनवला जावा, असं मला वाटतं.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button