प्रियांका चोप्रा हिची निर्मिती असलेला ‘पाणी’ हा मराठी चित्रपट काल १८ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. चित्रपटाचे कथानक मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती दाखवणारा चित्रपट आहे. नागदरवाडी गावातील हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे यांच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. त्यामुळे गाव खेड्यातून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला यावेळी प्रियांका चोप्राने आईसह हजेरी लावली होती. तर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या अंकिता वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगत सोबत उपस्थिती दर्शवली.
आदिनाथ कोठारे आणि त्याची लेक जिजानेही या सोहळ्याला उपस्थिती देऊन अधिक रंगत आणली. ऋचा वैद्य, आशुतोष गोवारीकर , सुनीता गोवारीकर आई बरेचसे सेलिब्रिटी यावेळी एकत्र पाहायला मिळाले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आदिनाथची पत्नी उर्मिला कोठारे मात्र कुठेच दिसली नाही. उर्मिला कोठारे ही गेली कित्येक दिवस कोठारे कुटुंबापासून वेगळी राहते असे बोलले जाते. मध्यंतरी या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चाही पाहायला मिळाली होती. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून उर्मिलाने आदिनाथसोबत किंवा आदिनाथने उर्मिला सोबत एकत्र फोटोही शेअर केलेला नाही. दरम्यान आदिनाथ कोठारे या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. पाणी हा त्याचा दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट आहे आणि त्याचमुळे या चित्रपटावेळी उर्मिला कुठेच दिसत नसल्याने या चर्चा अधिक गडद होऊ लागल्या आहेत.
दरम्यान आदिनाथचा दिग्दर्शक म्हणून पदार्पण असलेल्या पाणी या चित्रपटासाठी महेश कोठारे यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. १८ ऑक्टोबर १९९४ साली आदिनाथने ‘माझा छकुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते आणि आता १८ ऑक्टोबर २०२४ मध्ये तो बरोबर ३० वर्षाने दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय अशी एक खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत आदिनाथला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या.