news

शिवानी सुर्वे अजिंक्य ननावरे पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई…केळवणाचा फोटो शेअर करत म्हणते

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका फेम अभिनेता अजिंक्य ननावरे ह्याने अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्याशी मोठ्या थाटात लग्न केलेले पाहायला मिळाले. गेल्या ८ वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण घरच्यांचा संमती नंतरच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य प्रमाणे आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेची नायिका म्हणजेच अभिनेत्री तीतीक्षा तावडे ही देखील लवकरच लग्नगाठ बांधताना दिसणार आहे. तीतीक्षा तावडे ही अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्या प्रेमात असल्याचे सर्वश्रुत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र फिरताना स्पॉट झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे हे नाते आता लग्नाच्या बंधनात अडकलेले पाहायला मिळणार आहे. ‘त्याने मला डेट बद्दल विचारलं, आणि आता ते केळवणा पर्यंत येऊन पोहोचलं आहे’. असे म्हणत या दोघांनी लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.

titeeksha tawade and siddhath
titeeksha tawade and siddhath

तीतीक्षा आणि सिद्धार्थ यांनी एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे. त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थ आणि तीतीक्षा दोघेही ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेतून एकत्रित झळकले होते. एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम जुळून आले. सिध्दार्थने मराठी मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे. यासोबतच तो बॉलिवूड चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. दृश्यम २ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी त्याने वजन वाढवले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात तो सहाय्यक भूमिकेत झळकला आहे. तर तीतीक्षा तावडे ही देखील गेली अनेक वर्षे मराठी मालिका सृष्टीत काम करत आहे.

titeeksha tawade and siddhath kelwan
titeeksha tawade and siddhath kelwan

खुशबू तावडे या तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तीतीक्षा देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाली. सरस्वती, जयंती, वास्तू रहस्य अशा चित्रपट, मालिकेतून तिने प्रमुख भूमिका साकारलेली पहायला मिळाली. तू अशी जवळी रहा या २०१८ मध्ये प्रसारित झालेल्या मालिकेत सिद्धार्थ सोबत तिला प्रमुख भूमिका मिळाली. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करू लागले. आता ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे दोघेही विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत. त्यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली असून या सोहळ्याच्या थाट कसा असणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button