news

अतिशय दुःखद बातमी तेजश्री प्रधानला मातृशोक… कठीण प्रसंगात नेहमी साथ देणारी सर्वात जवळची व्यक्ती गेल्याने

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला मातृशोक झाला आहे. तेजश्रीची आई सीमा प्रधान यांनी गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. तेजश्रीची आई गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. त्यांच्या आजारपणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आजारपणामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून अंथरुणाला खिळून असल्याचे सांगितले जाते. आईच्या निधनाने तेजश्रीच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आईला सोबत घेऊनच केली होती. सलग तीन चित्रपटात काम करताना तिची आई सतत तिच्या सोबत असायची. हिरॉईनची आई म्हणून नाही तर एका कोपऱ्यात जाऊन त्या निवांतपणे बसलेल्या असायच्या.

actress tejashri pradhan family photo
actress tejashri pradhan family photo

यामागे त्यांचं एवढंच म्हणणं असायचं की क्षेत्र कुठलंही वाईट नसतं त्यात काम करणारी माणसं ही ओळखली पाहिजेत हे आपण ठरवायला हवं असं त्यांचं मत असायचं. त्यानंतर तीन चित्रपट केल्यानंतर त्यांनी तेजश्रीला ‘जा तू पुढचा प्रवास तू योग्य करशील’ असा त्यांनी तेजश्रीला पाठिंबा दिला होता. तेजश्री सध्या स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच तेजश्रीची ऑनस्क्रीन सासूबाई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. त्यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ सोबतचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेजश्री ही प्रधान कुटुंबातली धाकटी मुलगी. शलाका आणि तेजश्री अशा त्यांना दोन मुली आहेत.

tejashri pradhan mother and father photo
tejashri pradhan mother and father photo

शलाकाला वाईल्डलाईफ फोटोग्राफीची आवड आहे. तर तेजश्रीने अभिनय क्षेत्राची वाट धरली. गोजिरवाण्या घरात या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते. या सर्व अभिनय क्षेत्राच्या वाटचालीत तिला आईची खंबीर साथ मिळाली होती. शशांक केतकर सोबत घटस्फोट झाल्यानंतर जवळच्याच नातेवाईकांकडून तिच्या आईला टोमणे खावे लागायचे. याला तेजश्रीच्या आईने चोख उत्तर दिले होते. त्यामुळे तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचे महत्व खूप होते. आईच्या निधनामुळे तेजश्री आता पूर्णपणे खचून गेली आहे. या दुःखातून सावरण्याचे तिला बळ मिळो हीच सदिच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button