news

आणि माझं उत्तर आहे हो हो हो ….अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली

आपल्या भावभावना चाहत्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम मानले जाते. बरेचसे कलाकार मंडळी त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक गुपितं या ठिकाणी उघड करत असतात. त्यामुळे कोणता कलाकार कोणाच्या प्रेमात आहे याचेही खुलासे त्यांच्या चाहत्यांना होतात. आता काही वेळापूर्वीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करत ‘आणि माझं उत्तर आहे हो हो हो…’ असे म्हणत प्रेमाची जाहीरपणे कबुली दिलेली आहे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर प्रेमाची कबुली देणारे हे खास क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अनेक मीडिया माध्यमातून तिचे हे फोटो ब्लर करून प्रेक्षकांना ही अभिनेत्री कोण आहे असे ओळखण्यास सांगितले आहे.

actress tejashri jadhav
actress tejashri jadhav

त्यामुळे ही अभिनेत्री ईशा केसकर असावी असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. ऋषी सक्सेना आणि ईशा केसकर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे प्रेक्षकांना माहीत आहे त्यामुळे हे दोघे तेच आहेत असा अंदाज बांधण्यात आला आहे. पण ही अभिनेत्री ईशा केसकर नसून तेजश्री जाधव आहे हे नुकतेच समोर आले आहे. तेजश्रीने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जाहीर करणे तूर्तास तरी टाळले आहे. बॉयफ्रेंडचे पाठमोरे असलेले फोटोच तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे अनेकांना तिचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण असा प्रश्न पडला आहे. तेजश्री जाधव ही एक अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. बलोच, धर्मावरम, अकिरा, अट्टी अशा मराठी, टॉलिवूड तसेच बॉलिवूड चित्रपटातून तेजश्री जाधव अभिनेत्री म्हणून झळकली आहे.

actress tejashree jadhav
actress tejashree jadhav

मराठी बिग बॉसच्या शोमध्ये ती येणार अशी चर्चा गेल्या वेळी पाहायला मिळाली होती. पण स्पर्धकांची यादी जाहीर केल्यानंतर तिच्या नावाची चर्चा थांबली होती.दरम्यान बिग बॉसच्या रियुनियन पार्टीत तेजश्रीने हजेरी लावली होती. स्मिता गोंदकर हि तिची खास मैत्रीण असल्याने तिने दिलेल्या पार्टीत तेजश्री आवर्जून सहभागी झाली होती. तेजश्रीने आजवर चित्रपटातून अनेक छोट्या मोठया भूमिका साकारल्या आहेत. पण म्हणावी तशी थोडं भूमिका तिच्या वाट्याला न आल्याने ती प्रसिद्धीपासून थोडीशी लांब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button