
सोशल मीडियामुळे कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक बॉंडिंग तयार होत असते. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता या माध्यमातून पूर्ण होते. अर्थात कलाकारांनाही या माध्यमाने मोठी प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. पण या सोशल मीडियावर तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. असेच काहीसे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याबाबतीत आज घडत आहे. काल सोनालीने एक नवीन फोटोशूट केले.
या फोटोशूटसाठी तिने घातलेला ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोनालीने घातलेला हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला हे काय घातलंय?… म्हणत ट्रोल केलं आहे. काय पोतं घातलंय….का? हे असे घालायचे???….मॅडमला पडदा कोणी घालायला दिला….गोधडी मस्त आहे ओ…खिडकीचे पडदे काढून ड्रेस बनवला वाटतं… अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया तिला या फोटोशूटवर मिळत आहेत. दरम्यान सोनालीने घातलेला हा ड्रेस कालपासून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रसिद्धीसाठी केलेला अट्टाहास अशीही टीका तिच्यावर करण्यात येत आहे. पण यातच काहींनी मात्र तिच्या या ड्रेस सेन्सचंही आणि स्टायलिस्टचंही कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर ट्रोल होणं ही कलाकारांसाठी काही नवीन गोष्ट नाही. उलट यामुळे त्यांना चर्चेत राहण्यासाठीची एक संधीच मिळत असते. ट्रोलर्सला उत्तरं देत बसण्यापेक्षा आपण कामावर लक्ष द्यावं असे प्रकार बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत घडत असतात त्यामुळे सोनालीने देखील या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं आहे.