स्मिता पाटीलची भाची आहे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री … २७ व्या वर्षी वैधव्य लग्नामुळे डिप्रेशनमध्ये गेली आत्महत्येचा विचार केला पण

कला क्षेत्रात येण्यासाठी पाठीशी कोणाचा तरी हात असावा लागतो असं पूर्वीच्या काळी बघायला मिळायचं. आताच्या घडीला या गोष्टी फक्त तुमच्या टॅलेंटवरच अवलंबून असताना पाहायला मिळतात. पण पूर्वी कुटुंबातील कोणा व्यक्तीचे अनुकरण करून तुम्हाला या कलाक्षेत्राची ओढ निर्माण होते. आज अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात. ही मराठी अभिनेत्री म्हणजेच विद्या माळवदे होय. विद्या माळवदे ही चक दे इंडिया चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली होती. या चित्रपटात तिने खलनायिका साकारली होती. त्यामुळे तिची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती.

आजही विद्या माळवदे बॉलिवूड सृष्टीत कार्यरत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्या माळवदे हिने स्मिता पाटील सोबतच तीचं नातं उलगडलं आहे. विद्या माळवदे ही स्मिता पाटीलची भाची आहे. स्मिता पाटीलने आम्हाला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. आमची ती प्रेरणास्थान आहे. तिच्याकडे पाहूनच मी अभिनय क्षेत्रात आले असे ती सांगते. विद्या मापवदे हिने सुरुवातीला एअर होस्टेस म्हणून काम केले होते. अरविंद सिंग बग्गा या पायलट असलेल्या तरुणाशी तिने लग्नागाठ बांधली होती. २००० साली अरविंद बग्गा यांचे विमान अपघातात निधन झाले.

वयाच्या २७ व्या वर्षी वैधव्य आलेल्या विद्याला जीवन नकोसे झाले. डिप्रेशनमुळे तिने आत्म,ह त्या करण्याचा निर्णय घेतला. पण वडिलांनी समजूत घातल्यानंतर विद्याने स्वतःला सावरले. इंतहा चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊलही टाकले. २००९ मध्ये तिने संजय दायमाशी लग्न केले. आज वयाच्या ५२ व्या वर्षीही विद्या योगसाधना करून स्वतःला फिट ठेवताना दिसत आहे. योग साधनेमुळे आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडले असे ती सांगते.