गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांनी मन सुन्न झालं आहे. बदलापूरच्या घटनेनंतर तर राजकारण्यांना देखील खडबडून जाग आल्याचे चित्र दिसून आले. आज याच पार्श्वभूमीवर मविआने बंद पुकारला होता. मात्र कोर्टाने या बंद ला अधिकृत रित्या परवानगी न दिल्याने बंदचा निर्णय मागे घ्यावा लागला. बदलापूरच्या घटनेत दोन चिमुकलींवर लैगिक अत्याचार झाले ते पाहून प्रत्येकाला त्या मुलींमध्ये आपलीच लेक दिसून आली..’आम्हाला लाडकी बहीण योजना नको तर लाडक्या बहिणींच्या लेकींना सुरक्षा द्या’ अशी मागणी करण्यात येऊ लागली. मागील सात ते आठ दिवसांत बदलापूर, पुणे , अकोला, लातूर, मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणांहून या संतापजनक बातम्या उघडकीस येऊ लागल्या आहेत.
यावरून कला सृष्टीतही तीव्र भावना उमटवण्यात येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री शुभांगी गोखले या त्यांच्या परखड मतासाठी नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या अवास्तव गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर खुप व्हायरल झाली होती. आता मुलींवर होत असलेल्या अत्याचारावर त्यांनी परखड मत मांडलेलं दिसत आहे. सरकारला धारेवर धरत शुभांगी गोखले म्हणतात की, “तसंही सरकारच्या कुठल्याही योजनेचा… कोव्हिड लस सोडल्यास- लाभ मला मिळाला नाही- मिळणार नाही… Tax मी भरतच राहणार…पण मला आता कायद्याने “सात खून माफ” (दरमहा) हा हक्क द्यावा…या आरोपींना कुठलीही पळवाट मिळता कामा”.