news

“कुणीतरी येणार येणार गं” म्हणत या प्रसिद्ध अभिनेत्रीचे डोहाळजेवणाचे फोटो होत आहेत व्हायरल

एखाद्या महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आई होणं. मग ह्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहताना पाहायला मिळते. लहान बाळाच्या आगमनाने घरातील सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य उमटत. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉस फेम सई लोकूर हिने काही दिवसांपूर्वीच तिचे डोहाळेजेवण साजरे केले. सईच्या डोहाळे जेवणाला बिग बॉसमधील तिचे काही सहस्पर्धक हजेरी लावताना दिसले होते. सई पाठोपाठ असता आणखी एका अभिनेत्रीने तिचे डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही अभिनेत्री आहे सरिता मेहेंदळे जोशी. सरिता मेहेंदळे हिने नुकतेच डोहाळजेवण साजरे केलेले आहे. हा सोहळा सारिताने पारंपरिक पद्धतीने साजरा केला.

sarita mehandale with husband saurabh joshi dohale jevan
sarita mehandale with husband saurabh joshi dohale jevan

तिच्या या लवकरच आई होण्याच्या गोड बातमीवर मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. सरिता मेहेंदळे ही मूळची सांगलीची. तिचे शालेय शिक्षण सांगली जिल्ह्यातील चाटे स्कूलमधून झाले. पदवीच्या शिक्षणानंतर अभिनयाची ओढ तिला मुंबईला घेऊन आली. लहानपणापासूनच तीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॉलेज फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. सरिता जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिने अभिनय क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी थोडा संघर्ष केला. अर्धसत्य, ए चल असं नसतं रे अशा विविध नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. ए चल असं नसतं रे या नाटकामुळे तिला मराठी मालिकांमध्ये येण्याची संधी मिळाली. सरस्वती , कन्यादान, भागो मोहन प्यारे अशा मालिकेतून सरिता झळकली होती.

sarita mehndale baby shower photos
sarita mehndale baby shower photos

कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. सरस्वती या मालिकेमुळे सरिता प्रकाशझोतात आली होती. याच मालिकेनंतर ती कन्यादान मालिकेत दिसली होती. अतुल परचुरे यांच्यासोबत तिने भागो मोहन प्यारे मालिकेत काम केले होते. या मालिकेनंतर सरिता फारशी कोणत्या मालिकेत पाहायला मिळाली नाही. सौरभ जोशी सोबत तिचे लग्न झाले असून आता ती घरसंसारत रमलेली पाहायला मिळत आहे. यातूनच आता आईपणाचा ती अनुभव घेत आहे. या नवीन प्रवासासाठी आणि होणाऱ्या बाळाच्या सुदृढ आयुष्यासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button