marathi tadka

अनेकांसोबत नावं तिचं जोडलं…अखेर प्रेमाची कबुली देत पूजाने आता सिंगल नसल्याचे जाहीर केले

अभिनेत्री पूजा सावंत हिचे नाव कित्येकदा तिच्या सहकलाकारांसोबत जोडले गेले होते. भूषण प्रधान ते वैभव तत्ववादी हे तिचे खूप चांगले मित्र असूनही ती त्यांच्या नावासोबत जोडली गेली होती. या दोघांना ती डेट करतीये अशीही चर्चा अनेकदा रंगलेली पाहायला मिळाली होती. पण आता स्वतःच पूजा सावंतने तिच्या बॉयफ्रेंड सोबतचा एक खास फोटो शेअर करून प्रेमात असल्याची जाहीर कबूली दिली आहे. या फोटोमध्ये पूजाच्या बोटातली अंगठी खूप काही सांगून जाते. पूजाने तिच्या बॉयफ्रेंडचा पाठमोरा असलेला बिचवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने बोटात अंगठी घेतल्याचे दिसून येते. एका खास व्यक्तीसोबत मी माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहे असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. पुजाच्या या खास फोटोमुळे ती आता सिंगल नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे मात्र अनेक तरुणांची मनं तिने दुखावली आहेत. पूजावर प्रेम करणारे तिचे चाहते आता ती सिंगल नसल्याचे पाहून नाराज झाले आहेत.

actress pooja sawant
actress pooja sawant

तर दुसरीकडे मात्र तिच्या चाहत्यांनी अखेर ती विवाहबद्ध होतेय हे पाहून अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. पूजा सावंतने अजून तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जाहीर केलेले नाही मात्र हा मिस्ट्री बॉय आहे तरी कोण हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अर्थात तिने ज्या जोडीदाराची निवड केली आहे तो मराठीच असावा अशी एक माफक अपेक्षा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. पण तरीही तो कोण आहे हे तिने लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी केली जात आहे. पूजा सावंत हिने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पदार्पण केले होते. विविध धाटणीचे चित्रपट तिच्या वाट्याला आले. मात्र जास्त उंची असल्या कारणाने मला खूप कमी चित्रपट मिळाले अशी एक खंत तिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत व्यक्त केली होती. उंची जास्त असल्यामुळे तिचा विचार केला जात नसे.

actress pooja sawant latest news
actress pooja sawant latest news

जर तिची नायिकेसाठी निवड केलीच तर तिच्या जोडीचा नायक हादेखील उंचच असायला हवा अशी मागणी असायची. त्यामुळे कित्येकदा तिच्या हातातून चांगले चांगले प्रोजेक्ट निसटले होते. पण चित्रपटातील नायक उंच असो किंवा नसो सध्या तिच्या जोडीदाराच्या फोटोंवरून तिने तिचा बॉयफ्रेंड तेवढ्याच उंचीचा निवडलाय हे मात्र खरे. पूजा सावंतने शेअर केलेला हा फोटो आता सेलिब्रिटी विश्वातही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे अनेकजण या मिस्ट्री बॉयचा शोध घेऊ लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button