news

दुःखद बातमी! मराठी मालिका अभिनेत्रीला मातृशोक…महिनाभर दवाखान्यात उपचार घेऊनही आईचं दुखणं थांबत नव्हतं

देवमाणूस, वैजू नं १ आणि अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नीलम पांचाळ हिला मातृशोक झाला आहे. नीलम पांचाळ ही मराठी मालिका अभिनेता, लेखक मिहीर राजदा याची पत्नी आहे. नीलम पांचाळ हिची आई वसंतिबेन पांचाळ या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. गेल्या महिनाभरापासून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईला लवकर बरं व्हावं यासाठी नीलम महाकुंभ मेळ्यात अन्नदान करताना दिसली होती.

पण आईच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने ती काळजीत होती. गेल्या ४ दिवसांपासून निलमच्या आईची तब्येत खूपच खालावली होती. आईसाठी प्रार्थना करा अशी इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट लिहिली होती. पण उपचार सुरू असतानाच आज ११ मार्च रोजी निलमच्या आईचे दुःखद निधन झाले. निलमची आई वसंतिबेन या ७४ वर्षांच्या होत्या. आईच्या निधनाने नीलम पुरती भावूक झाली आहे.

nilam panchal with mother and mihir rajda
nilam panchal with mother and mihir rajda

नीलम पांचाळ ही गुजराथी अभिनेत्री आहे हेलारो या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरम्यान मिहीर याने हिंदी मालिकेतून पुढे मराठी मालिकेकडे आपला मार्ग वळवला. यातूनच निलमला देखील मराठी सृष्टीत येण्याचा मार्ग गवसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button