news

एकीकडे पियुष रानडेने केले ३ रे लग्न…तर दुसरीकडे मयुरीने केलं घराचं स्वप्न पूर्ण

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांचा पुण्यात मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. पियुष रानडे तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला हे पाहून अनेकांना मोठे आश्चर्य वाटले . पण सुरुची आणि पियुष हे दोघेही ‘अंजली झेप स्वप्नांची ‘ या मालिकेपासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ साली ही मालिका झी युवा या वाहिनीवर टेलिकास्ट करण्यात येत होती. तेव्हापासूनच या दोघांनी आपले प्रेमप्रकरण सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. नुकताच दिलेल्या एका प्रतिक्रियेत सुरुचीने या गोष्टीचा उलगडा केला आहे. त्यामुळे हे लग्न करून मी खूप खुश आहे असे सुरुचीने म्हटले आहे. काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी हा लग्नसोहळा केला होता त्यामुळे अनेकांना या लग्नाबाबत आश्चर्य वाटले होते. एकीकडे पियुष रानडे तिसरे लग्न करताना दिसला मात्र दुसरीकडे त्याच्या दुसऱ्या पत्नीने तिचे स्वप्न सत्यात उतरवलेले पाहायला मिळत आहे.

actress mayuri wagh new home pooja
actress mayuri wagh new home pooja

शाल्मली तोळे हिच्यासोबत पियुषचे पहिले लग्न झाले होते. पण काही वर्षांतच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पियुष त्याची सह कलाकार मयुरी वाघ हिच्या प्रेमात पडला. अस्मिता ही मालिका संपल्यानंतर या दोघांनी लग्न केले होते. पण काही वर्षातच पियुषचा मयुरी सोबत घटस्फोट झाला. त्यांनी घटस्फोट घेतला हे देखील त्यांनी लपवून ठेवले होते. मात्र त्यानंतर मयुरी अनेकदा एकटीचेच फोटो सोशल मीडियावर अपलोड करू लागली तेव्हा त्यांच्यात घटस्फोट झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. यानंतर मयुरीने निर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याची घोषणा केली. आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेतून ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकू लागली. नुकतेच मयुरीने तिचे एक स्वप्न सत्यात उतरवलेलं पाहायला मिळत आहे. एकीकडे पियुषने तिसरे लग्न केले त्याच बाजूला मयुरीने देखील स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करून आपले स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

puyush ranade wedding photos
puyush ranade wedding photos

“माझी बकेट लिस्ट मधली एक विश पूर्ण झाली” असे म्हणत मयुरीने तिच्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नव्या प्रवासाला सुरुवात होताना मयुरी खूपच आनंदी दिसत होती. मयुरी ही मूळची डोंबिवलीची. तिने साइड डान्सर आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वचन दिले तू मला या स्टार प्रवाह वरील मालिकेतून तिने मराठी सृष्टीत पदार्पण केले होते. झी मराठीवरी अस्मिता या मालिकेत तिने डिटेक्टिव्ह अस्मिताची भूमिका गाजवली होती. ग्लो अँड लव्हली, टपरवेअर, हार्पिक, डाबर च्यवनप्राश आणि मॅग्नम आइस्क्रीम यांसारख्या जाहिरातींमध्ये देखील ती झळकली आहे. ती हाऊसफुल आणि सुगरण आणि मेजवानी परिपूर्णा किचन सारख्या रिऍलिटी शोमध्ये तिने सूत्रसंचालन केले होते. गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम केल्यानंतर आज तिचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. हे पाहून मराठी इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी तिचे खास अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button