news

“मार्केटमध्ये नवा scam आलाय” हे माझ्या परवानगीशिवाय घडतंय…आर्या आंबेकर चांगलीच संतापली

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली गायिका आर्या आंबेकर हिने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण गायलेली गाणी अनेक युट्युब चॅनल्सने त्यांच्या अकाउंटवर शेअर केली आहेत. आपल्या परवानगीशिवाय हे युट्युबर असे कसे करू शकतात ? म्हणत आर्या आंबेकरने जाहीरपणे संताप व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे. नुकत्याच एका व्हिडिओमध्ये आर्या आंबेकरने हा नवीन प्रकारचा स्कॅम उघडकीस आणला आहे आणि गायकांना संगीतकारांना तिने अशा स्कॅमपासून सतर्क राहण्यास सांगितले आहे. अर्थात हा मार्केटमध्ये नवीन स्कॅम आल्याने आणखी एक मोठी अडचण तिच्या समोर उभी राहिली आहे. आर्या आंबेकर या युट्युबर विरोधात कुठलीच तक्रार करू शकत नाहीये कारण तिने गायलेले तिच्या आवाजातील व्हिडीओ तिच्याकडेच उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे कॉपी राईटचा तिला दावाच करता येत नाहीये.

actress and singer aarya ambekar
actress and singer aarya ambekar

यामुळे आर्याला अशा गाणी प्रसिद्ध करणाऱ्यांवर आळा घालता येत नाहीये किंवा त्यांच्या विरोधात तक्रारही नोंदवता येत नाहीये. मात्र यामध्ये तिने तिचे गुरू अर्थात अवधूत गुप्तेलाच लक्ष घालण्याची विनंती केली आहे जेणेकरून तिच्यासमोरचा हा प्रश्न तिला सोडवता येईल. आर्या आंबेकरचे स्वतःचे ऑफिशियल युट्युब चॅनल आहे. मात्र तिने गायलेले काही अभंगाचे व्हिडीओ तिच्याकडे उपलब्ध नाहीयेत. हे व्हिडीओ इतर युट्युब चॅनलवर कुठलीही परवानगी न घेता सर्रास पणे दाखवले जात आहेत . फक्त आपला आवाज असूनही मला ते माझे व्हिडीओ आहेत हे प्रूफ करता येत नाहीयेत आणि याचमुळे मला या घोटाळ्याविरोधात कुठलीही तक्रार दाखल करता येत नाही असे तिचे म्हणणे आहे. यासंदर्भात कोणाकडे काही सल्ला असेल किंवा त्यावर काय उपाययोजना करता येईल असेही तिने विचारले आहे. आर्या आंबेकर याबाबत म्हणते की, “New scam in the market.. beware musicians..

मी माझ्या live concerts मध्ये गायलेल्या काही गाण्यांचे videos काही लोकांनी YouTube वर पोस्ट केले होते. त्या videos मधून audios extract करून “latest Marathi Kirtan” नावाच्या एका music label ने audio platforms वर स्वतःच्या copyright सकट upload केले.! हे audios (videos देखिल!) माझ्या परवानगी शिवाय upload झालेले आहेत. पण त्यावर claim करता येण्यासाठी original व्हिडिओ किंवा ऑडियो माझा स्वतःचा असायला हवा. तो नसल्यामुळे, माझा आवाज माझ्या परवानगी शिवाय वापरला असूनही मला claim करता येत नाहीये! How sad can this get!” सोशल मीडियावर कॉपी राईट्स असलेल्या व्हिडिओला त्यांच्या परवानगीशिवाय दाखवता येत नसते. पण आर्यकडे स्वतःचेच व्हिडीओ नसल्याने ती जाहीरपणे आपला संताप व्यक्त करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button