मला काहीच कल्पना न देता काढलं येत्या मे महिन्यात मी मुलासोबत परदेशात जाण्यासाठी… प्रद्युम्न च्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

सोनी वाहिनीवरील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे सीआयडी. ही मालिका २०१८ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसली होती. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर या मालिकेचा दुसरा भाग सुरू करण्यात आला. पण आता सीआयडी २ मध्ये एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे. एसीपी प्रद्युम्न यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत सोनी वाहिनीने लक्षवेधी पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून मात्र प्रेक्षकांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. प्रद्युम्नचे पात्र असेच चालू राहावे अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे. पण आता स्वतः शिवाजी साटम यांनाच या ट्विस्टबद्दल कल्पना नसल्याचे समोर आले आहे.
यावरून शिवाजी साटम यांना तडकाफडकी मालिकेतून काढलं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..कारण शिवाजी साटम याबद्दल म्हणतात की, ” मला याबद्दल काहीच कल्पना नाही. मे महिन्यात मी मुलासोबत परदेशात जाण्यासाठी सुट्टी घेतली आहे. मालिकेत पुढे काय होणार आहे हे निर्मात्याला माहीत आहे. जर माझी भूमिका संपवली असेल तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. मला त्यांनी तसं कळवलंही नाही. महत्वाचं म्हणजे मी मालिकेसाठी शूटिंग करत नाही. मी इतके वर्ष ही भूमिका केली त्याबद्दल प्रेक्षकांकडून मला प्रचंड प्रेम मिळालं आहे . एवढं सगळं काम करताना एक ब्रेक तर घ्यायलाच हवा ना!”. शिवाजी साटम यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर आता सोनी वाहिनीशी त्यांचं काही बिनसलं तर नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं आहे. एका पाकिस्तानी चाहत्यानेही तुम्ही मालिकेत असायला हवं असा मेसेज त्यांना केला आहे. यामध्ये आणखी एक असा ट्विस्ट आहे की आता मालिकेत एक नवी एन्ट्री होत आहे. अभिनेता पार्थ समथान मालिकेत ही भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. पार्थ समथान हा हिंदी सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याच्या एंट्रीनेच शिवाजी साटम यांना मालिकेतून काढण्यात आले अशी एक चर्चा सुरू झाली आहे.