सध्या पॉडकस्टचा जमाना आहे. महत्वाचं म्हणजे आपल्या कलाकाराला जवळून जाणून घेण्याची संधी या पॉडकास्टमुळे होत असते. मराठी सृष्टीत अनेक कलाकार अशी पॉडकस्ट बनवू लागले आहेत. त्यातील एका अभिनेत्याच्या पॉडकास्टला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुषार साळी हे मराठी मालिका अभिनेते आहेत. १० जून १९८७ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. भवन्स कॉलेज मधून त्यांनी मास मीडियामध्ये पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून थियेटर आर्ट्समधील मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. अभिनयामुळे त्यांची खास ओळख झाली आहे.
तुषार साळी यांची पत्नी प्रतिक्षा साळी एक वित्तीय सल्लागार आणि रिअल्टर आहेत. त्यांची स्वतःची शुभारंभ नावाची कंपनी आहे. त्यांची मुलगी सान्वी ७ वर्षांची असून ती बिलाबाँग इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकते. तुषार यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. ‘अम्ही दोघे राजा राणी’, ‘सखी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘कांटा रुते कोणाला’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या मालिकांत त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ते ‘फुलाला सुगंध मातीचा’ या प्रसिद्ध मालिकेत विक्रम या भूमिकेत झळकले होते. त्यानंतर ते ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसले, जिथे रश्मी अनपट सोबत त्यांना स्क्रीन शेअर करता आली. ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत त्यांनी मंगेशची भूमिका केली होती.
तुषार साळी यांचा स्वतःचा YouTube चॅनल आहे, ज्यावर ते एक सेलिब्रिटी शो होस्ट करतात.’ गप्पा टप्पांची मेजवानी विथ तुषार साळी’ या शोमध्ये ते मराठी सेलिब्रिटींना आमंत्रित करतात आणि लवकरच या शोमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हजेरी लावणार आहे. एवढच नाही तर तुषार साळी यांनी WalNut Media नावाची स्वतःची जाहिरात कंपनी सुरू केली आहे. ज्यात ते डिजिटल , कमर्शियल, कॉर्पोरेट जाहिराती आणि व्हिडिओ प्रॉडक्शनच्या सेवा पुरवतात. त्यांचा आगामी प्रोजेक्ट एक म्युझिक अल्बम आहे. याशिवाय ते हिंदी वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे सध्या त्यांनी मालिकांमधून ब्रेक घेतला आहे पण जर मुख्य भूमिका असेल आणि दमदार असेल तर त्यांना ती भूमिका करायला नक्की आवडेल असे त्यांनी सांगितले आहे .